लोकसभेत दिल्ली हिंसाचारावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले, गोंधळानंतर कामकाज स्थगित

दिल्ली हिंसाचाराचे आज जोरदार पडसाद लोकसभेत उमटल्याचे चित्र दिसून आले.  

Updated: Mar 3, 2020, 01:30 PM IST
लोकसभेत दिल्ली हिंसाचारावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले, गोंधळानंतर कामकाज स्थगित   title=

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराचे आज जोरदार पडसाद लोकसभेत उमटल्याचे चित्र दिसून आले. विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. सत्ताधारी उत्तर देत असताना विरोधकांनी आपले प्रश्न विचारणे सुरुच ठेवले. यामुळे काही काळ सभागृहात गोंधळ निर्माण झाला. यावेळी सभापतींनी विरोधकांना गोंधळ घालू नका, असे वारंवार बजावले. तरीही गोंधळ सुरुच होता. दिल्ली हिंसाचारावरून संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक दिसून येत होते. दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. राज्यसभा दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

राजधानी दिल्लीत हिंसाचार थांबला असला तरी तणाव कायम असून शांतता आहे. काही ठिकाणी हिंसाचाराच्या अफवा पसरविण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी याबाबत कडक भूमिका घेतली आहे. अनेकांची धरपकडही केली आहे. आतापर्यंत ८०० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचार बळींचे संख्या ४७ वर गेली आहे. तर अनेक जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर ईशान्य दिल्लीत ३३४ हिंसाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ५७ लोकांना अटकही करण्यात आली आहे.

दरम्यान, दंगल ४ दिवस चालणे हे देशासाठी योग्य नाही, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. महाविकासआघाडीच्या सरकारला शंभर दिवस झाल्याने काहींना वाईट वाटत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तर राज ठाकरेंच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

0