Pancard : Pancard हरवलंय? मग काळजी करू नका, फॉलो करा 'या' स्टेप्स!

Pancard Update: सध्याच्या काळात आपली सर्व कागदपत्रे आपल्यासाठी खूप महत्वाची झाली आहेत. त्यापैकी एक पॅन कार्ड आहे. पण पॅनकार्ड हरवलं तर सरकारी सर्वच कामे रखडून जातात. जर तुमचे पॅनकार्ड हरवलं तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. 

Updated: Feb 20, 2023, 04:36 PM IST
Pancard : Pancard हरवलंय? मग काळजी करू नका, फॉलो करा 'या' स्टेप्स!  title=

Pancard Update:  पॅनकार्ड (Pancard) आता सर्वांसाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट किंवा कागदपत्र बनलेला आहे. कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी कामासाठी पॅनकार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बँक खाते उघडणे, कर्ज घेणे, क्रेडिट कार्ड घेणे, पीएफ खात्यासाठी इत्यादी अनेक कामांसाठी पॅनकार्डचा वापर महत्वाचा आहे. त्याच बरोबर आर्थिक व्यवहारासाठीही ते महत्वाचे आहे. 50 हजारांहून अधिक व्यवहारांसाठी, आयकर विवरणपत्र भरण्यासाठीही पॅनकार्ड आवश्यक असते.

अनेकदा पॅन कार्ड हरवले किंवा चोरीलाही जाते. अशा परिस्थितीत लोक खूप अस्वस्थ होतात की, त्याचा कोणी गैरवापर करू करेल का? अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण पॅन कार्ड हरवल्यास, तुम्ही काही मिनिटांत तुमचे ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. तसेच अशा परिस्थितीत पहिल्यांदा तुम्ही त्याची नोंदणी करून घ्यावी. यासोबतच तुम्ही ही माहिती पॅनकार्ड ऑफिसलाही देऊ शकता. याच्या मदतीने तुमच्या पॅनकार्डमधून काही चुकीची गोष्ट घडली तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल. यानंतर तुम्ही ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता आणि नवीन पॅन कार्ड देखील मिळवू शकता.

वाचा: SBI Card वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ शुल्कात होणार वाढ! 

आधी पोलिस तक्रार करा

तुमचे पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास तुम्ही ताबडतोब तुमच्या स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि प्रथम माहिती अहवाल (FIR) तक्रारीची प्रत घ्या. यामुळे कोणीही तुमचा पॅन वापरून फसवणूक करू शकणार नाही.

ई-पॅन कार्ड घरी बसून डाउनलोड करू शकता:-

- सर्व प्रथम TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- आता https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html ला भेट द्यावी लागेल.
- आता येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल, आणि नंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक देखील येथे भरावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीखही येथे टाकावी लागेल.  
- त्यानंतर तुम्हाला नियम आणि अटींवर क्लिक करावे लागेल आणि येथे तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागेल. या नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल, जो तुम्हाला इथे टाकावा लागेल. 
- आता ‘कन्फर्मेशन’ या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल, जे तुम्ही ऑनलाइनद्वारे करू शकता. पेमेंट केल्यानंतर, तुमच्या ई-पॅन कार्डची PDF डाउनलोड केली जाईल, ज्यामध्ये तुम्ही तुमची जन्मतारीख पासवर्ड म्हणून टाकून ते उघडू शकता.