पॅनच्या नियमामध्ये बदल, तर आता या गोष्टीसाठी पॅनकार्ड अनिवार्य

तर आता पॅनकार्ड असणं आवश्यकच

Updated: Nov 22, 2018, 01:31 PM IST
पॅनच्या नियमामध्ये बदल, तर आता या गोष्टीसाठी पॅनकार्ड अनिवार्य title=

मुंबई : आयकर विभागाने पॅनच्या नियमामध्ये बदल केला आहे. याबाबत आयकर विभागने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार एका आर्थिक वर्षात जर 2.5 लाखांपेक्षा अधिकचं व्यवहार करणाऱ्या लोकांकडे आता पॅनकार्ड असणं आवश्यक असणार आहे. यासाठी 31 मेच्या आधी अर्ज करणं आवश्यक असणार आहे. खरेदी, विक्रीमधून मिळणारी रक्कम एक वर्षामध्ये 5 लाखाच्या वर असेल तरी त्यांना पॅनकार्ड आवश्यक असणार आहे.

आयकर विभागाला खरेदी-विक्री, कर आकारता यावा यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे. सोबतच आयकर विभागाने पॅनकार्डसाठी अर्ज करताना आई-वडिलांपासून वेगळं झाल्यानंतर वडिलांचं नाव लिहिण्याची अट रद्द केली आहे. आयकर विभागाने एक अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करत असताना जर अर्जदाराला आईचं नाव लावायचं असेल तर अर्जदार तसंही करु शकतो. सध्या पॅनकार्डवर अर्जदाराच्या नावाखाली वडिलांचं नाव असायचं. पण लग्नानंतर जर महिलेला आईचं नाव लावायचं असलं तरी तसा अर्ज करु शकता. 

नवा नियम 5 डिसेंबरपासून लागू होणार आहे. अधिसूचनेत अशी माहिती देण्यात आली आहे की, 'आई-वडिलांमध्ये जर फक्त आई असेल. तर ती व्य़क्ती पॅनकार्डवर आईचं नाव देऊ शकते. जर वडील वेगळे झाले असतील तर.'