Pakistani girl नंतर आता मेंढपाळाचा Video ट्रेंडमध्ये

Viral Video : Pakistani girl नंतर आता मेंढपाळाचा Video ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

Updated: Dec 5, 2022, 03:00 PM IST
Pakistani girl नंतर आता मेंढपाळाचा Video ट्रेंडमध्ये title=
Pakistani girl now shepherd dance video is trending on Social media nmp

Trending Video : सोशल मीडियावर (Social media) क्षणाक्षणाला काही ना काही व्हायरल होतं असतं. एखादा व्हिडिओ (Video) किंवा फोटो (Photo) नेटकऱ्यांना आवडला तर क्षणात तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. पाकिस्तानमधील तरुणीचा (Pakistani girl Video) डान्स व्हायरल (Dance Viral) झाल्यानंतर आता एका मेंढपाळाचा व्हिडिओ ट्रेंडमध्ये (Social media trends) आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. 

'पिछे बाराती आगे बैंड बाजा'

सोशल मीडियावर मोठ्या संख्येने डान्स रील्स पाहिला मिळतात. एखाद्या गाण्यावर कोणीतरी थिरकतं आणि नंतर त्या गाण्यावर आपल्याला अनेक रील्स बघायला मिळतात. असंच एक गोविंदाचं (Govinda) लोकप्रिय दुल्हे राजा यावर एक मेंढपाळने व्हिडिओ (shepherd dance video) बनवला आणि आज तो व्हायरल झाला आहे. 

 

हेसुद्धा - Viral Video : माधुरी दीक्षितनंतर आता Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन

 
मजेदार व्हिडिओ (Funny video) पाहून अवाक् व्हाल!

'पिछे बाराती आगे बैंड बाजा' या गाण्यावर या मेंढपाळाने भन्नाट डान्स नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. या व्हिडिओमध्ये गंमतीचा भाग म्हणजे जेव्हा हे गाणं सुरु होतं 'पिछे बाराती आगे बैंड बाजा' तेव्हा मागे मेंढा असतात आणि पुढे एक मुलगा गाढवावर बसलेला असतो. हा मजेदार व्हिडिओ नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. विशेष म्हणजे या मेंढपाळाने डान्स करताना जे हावभाव केले आहेत ते एकदम जबरदस्त आहेत.  (Pakistani girl now shepherd dance video is trending on Social media )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Oosm Dance (@oosm.dance)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) oosm.dance या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर यूजर्स (users) भरपूर कमेंट्स करत आहेत. गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील तरुणीने युनिक स्टाइलमध्ये धूम घातल्यावर आता मेंढापाळाचा हा डान्स नेटकऱ्यांना क्रेझी करत आहेत.