इमरान खानच्या अडचणी वाढल्या; निवडणूक आयोगाने जाहीर केले वॉरंट

पाकिस्तान निवडणूक आयोगाने एका अवमान प्रकरणी वॉरंट बजावले आहे. एका प्रकरणात वारंवर नोटीस पाठवूनही हजर न राहिल्यामुळे निवडणूक आयोगाला हा निर्यण घ्यावा लागला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 14, 2017, 10:43 PM IST
इमरान खानच्या अडचणी वाढल्या;  निवडणूक आयोगाने जाहीर केले वॉरंट title=

इस्लामाबाद : पाकिस्तान निवडणूक आयोगाने एका अवमान प्रकरणी वॉरंट बजावले आहे. एका प्रकरणात वारंवर नोटीस पाठवूनही हजर न राहिल्यामुळे निवडणूक आयोगाला हा निर्यण घ्यावा लागला.

इमरान खान हे पाकिस्तानातील तहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख आहेत. निवडणूक आयोग तरहीक ए इन्साफ पक्षाचे बंडखोर नेता नेते अकबर एस बाबर यांनी दाखल केलेल्या एका खटल्यात निवडणूक आयोग सुनवाई करत होता. आयोगाने खान यांना आयोगासमोर प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले होते.

इमरान यांचे वकील बाबर अवान यांनी म्हटले आहे की, इमरान खान सध्या विदेश दौऱ्यावर होते. काही वेळापूर्वीच त्यांचे पाकिस्तानात आगमन झाले आहे. दरम्यान,अकबर बाबर यांच्या वकीलाने म्हटले आहे की हा आयोगाच्या आदेशाचा अवमान आहे.

दरम्यान, आयोगानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे अटक करण्यापासून इमरान खान यांना स्वत:चा बचाव करायचा असेल तर, २५ सप्टेबरपर्यंत त्यांना एक लाख रूपयांचा जामीन द्यावा लागेल.