हैदराबाद : तेलंगणामध्ये गुरुवारी अनेक राजकीय घडामोडींना वेग आला. फक्त 10 तासातच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची पत्नीची घर वापसी झाली. काँग्रेसचे वरिष्ठ नेता सी. दामोदर राजनरसिम्हा यांची पत्नी पद्मिनी रेड्डी यांनी सकाळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पण त्याच दिवशी रात्री पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पद्मिनी रेड्डी या तेलंगणामधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते सी दामोदर राजनरसिम्हा यांची पत्नी आहेत. राजनरसिम्हा अविभाजित आंध्र प्रदेश राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत.
पद्मिनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षातून त्यांना त्याचा सामना देखील करावा लागला. पण उशिरा रात्री पद्मिनी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याचे कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण यांनी पद्मिनी यांनी रेड्डी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी पद्मिनी यांचं कौतूक देखील केलं.
भाजपला तेव्हा झटका लागला जेव्हा पद्मिनी रेड्डी यांनी 10 तासातच पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने म्हटलं की, पक्ष त्यांच्या निर्णयाचं सन्मान करते. तेलंगणामध्ये भाजप प्रवक्ते कृष्ण सागर राव यांनी म्हटलं की, रेड्डी यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा बोलून दाखवली होती आणि पक्ष महिला सबलीकरणाला महत्त्व देते. तेलंगणामध्ये 119 जागांसाठी 7 डिसेंबरला निवडणुका होणार आहेत.