मुंबई : पद्मावती या चित्रपटाची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे तसा या चित्रपटाला विरोधही वाढतोय.
चित्रपटाच्या शूटींगपासून विरोध करणारी करणी सेना आता १ डिसेंबरला भारत बंद ठेवण्याचं आवाहन करत आहे.
१ डिसेंबरला भारत बंद करण्यासोबतच चित्रपट रिलीज होऊ न देण्याचं आवाहन संघटनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कल्वी यांनी केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची हिंसा व्हावी अशी आमची इच्छा नाही. पण सरकारने आमच्या विरोधाला वेळीच ओळखून आमचं शांत राहणं गृहीत धरू नये. आम्ही कोणत्याही स्थितीत चित्रपट रिलीज होण्यास देणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.
पद्मावती चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण मध्यवर्ती भूमिकेत आहे. सोबतच शाहीद कपूर आणि रणवीर सिंह महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
पद्मावती चित्रपटामध्ये 'राणी पद्मावती'ला चूकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. इतिहासातील अनेक गोष्टी चूकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. असा विरोध करणार्या संघटनांचा आक्षेप आहे. तसेच काही दिवसांपूर्वी जर पद्मावती रिलिज झाला तर सिनेमागृहांचे नुकसान होईल असा धमकी वजा इशारादेखील देण्यात आला होता.
दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी या चित्रपटासाठी तब्बल १६० कोटींचा विमादेखील उतरवला आहे.