नवी दिल्ली : एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका जाहीर सभेत मोठं वक्तव्य केलं आहे.
एका जाहीर सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी 'भाजप - काँग्रेसला तेलंगणातून उखडून टाका' असं आवाहन केलं आहे.
आगामी काळात आपल्या पक्षातील सदस्यांची संख्या वाढवायची असून आमदारांची संख्याही वाढवायची आहे असंही असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.
पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला आतापासून तयारी करायची आहे. तेलंगणातून भाजप आणि काँग्रेसला संपवायचं आहे. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असंही ओवेसी यांनी म्हटलं.
#Owaisi urges party workers to uproot #BJP, #Cong from #Telangana
Read @ANI Story | https://t.co/JoRiWxv8Pk pic.twitter.com/89e53BMjTX
— ANI Digital (@ani_digital) March 2, 2018
तेलंगणामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे ओवेसी यांनी आतापासूनच कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या तेलंगणा विधानसभेत एमआयएमचे सात आमदार आहेत. पुढील वर्षी निवडणुका होणार असून ही संख्या वाढवायचा एमआयएमची योजना आहे.