'लॉकडाऊन नसतं तर कोरोनाबाधितांची संख्या ८.२ लाखांवर'

कोरोनामुळे दोन मंत्रालयात वाद 

Updated: Apr 11, 2020, 01:20 PM IST
'लॉकडाऊन नसतं तर कोरोनाबाधितांची संख्या ८.२ लाखांवर' title=

मुंबई : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनवर भारत सरकारच्या दोन मंत्रालयांमध्ये वाद सुरू झालाय. परदेशी मंत्रालयाने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या अभ्यासाचं उदाहरण देत अशी माहिती दिली की, १५ एप्रिलपर्यंत जर २१ दिवसांच लॉकडाऊन नसतं तर कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही ८.२ लाखांपर्यंत पोहोचली आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाचा असं म्हणणं आहे की, आयसीएमआरने असा कोणता अभ्यास केलेलाच नाही. 

परदेशी मंत्रालयाच्यावतीने सचिव विकास स्वरूप यांनी बुधवारी परदेशी मीडियाला माहिती देताना सांगितले की, महामारीबद्दल विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर लॉकडाऊनमुळे व्हायरसची वाढ कमी झाली आहे. जर सोशल डिस्टींसिंगचे नियम लावले नसते तर प्रत्येक दिवशी २.५ लोकांना कोरोनाची लागण झाली असते. 

लॉकडाऊनमुळे लोकांना बाहेर निघणं कठीण झाले. यामुळे नागरिकांचा सामाजिक वावर ७५% कमी झाला. यामुळे कोरोनाच्या संक्रमणाचा वेग हा ०.६२५ असा प्रति दिवस राहिला. 

पुढे स्वरूप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी या गोष्टीकडे दुसऱ्या पद्धतीने बघतो. जर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नसतं तर ही संख्या ८ लाख २० हजारावर गेली असती. मात्र लॉकडाऊनमुळे हा आकडा आता कमी आहे. देशातील ७८ जिल्ह्यात ८०% कोरोनाचे रूग्ण आहेत.