एक्सप्रेसच्या तिकीटावर कुटुंबातील सदस्यही करु शकतात प्रवास, फक्त इतकं काम करावं लागेल

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेकदा रेल्वे प्रवासाला (Railway travel) पसंती दिली जाते.  

Updated: Jul 3, 2021, 08:34 PM IST
एक्सप्रेसच्या तिकीटावर कुटुंबातील सदस्यही करु शकतात प्रवास, फक्त इतकं काम करावं लागेल title=

मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेकदा रेल्वे प्रवासाला (Railway travel) पसंती दिली जाते. रेल्वे ठराविक वेळेत आपल्याला अपेक्षित ठिकाणी पोहचवते. रेल्वे प्रवासासाठी आपण प्रवासाच्या काही दिवसांआधीच तिकीट काढून ठेवतो. पण अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे ऐनवेळेस प्रवास करता येत नाही. त्यामुळे नाईलाज म्हणून प्रवास रद्द करावा लागतो. परिस्थितीही अशी असते की प्रवास रद्दही करता येत नाही तसेच कामही महत्वाचं असतं. अशा पेचात्मक प्रसंगात आपण चांगलेच फसले जातो. अशा वेळेस आपण तिकीट कॅन्सल करुन त्या ठिकाणी आपल्या कुटुंबियांना पाठवतो. त्यासाठी आपण पुन्हा कुटुंबितील सदस्याच्या नावाने तिकीट बूक करतो. पण ऐनवेळेस कन्फर्म तिकीट मिळत नाही अन् गोची होते. पण कुटुंबियाच्या नावाने नव्याने तिकीट काढण्याची गरज नाही. (Other family members can also travel on your reserved train ticket know  the rule) 
 
भारतीय रेल्वेकडून अशा पेचात्मक स्थितीत प्रवाशांसाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करुन देते. याबाबत खूप कमी प्रवाशांना माहिती आहे. नियमांनुसार,  जर तुम्ही प्रवास करण्यास असमर्थ असाल, तर तुम्ही ते तिकीट कुटुंबियाच्या नावे ट्रान्सफर करु शकता. यासाठी तुम्हाला 24 तासांआधी नजीकच्या रेल्वे रिझर्व्हेशन सेंटर गाठावं लागेल.

काउंटरवर गेल्यानंतर मूळ तिकीटासह स्वत:च्या आणि कुटुंबातील सदस्याच्या कागदपत्रांसह सादर करावे लागतील. यानंर तिकीट कुटुंबियातील सदस्याच्या नावे ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करावं लागेल. ज्यानंतर रेल्वे अधिकारी ते तिकीट कुटुंबातील सदस्याच्या नावे हस्तांतरित करुन देईल.  

लग्नासाठी जाणाऱ्यांना मिळते सुविधा
 
नियमांनुसार, हे तिकीट केवळ कुटुंबियांच्या नावेच हस्तांतरित करता येतात. तुम्ही म्हणाल मित्राच्या नावे तिकीट ट्रान्सफर करायची आहे, तर तसं होणार नाही. कुटुंबियांशिवाय या विशेष सेवेचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो. पण यासाठी संस्थेच्या प्रमुखाचं पत्र अनिर्वाय आहे. त्यासाठी प्रवासाच्या 48 तासांआधी अर्ज करावं लागतं.  

लग्न किंवा पार्टीला जाणाऱ्यांसमोर अशीच पेचात्मक स्थिती उद्भावते. अशा वेळेस सहल, लग्न आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्याला आवश्यक कागदपत्रांसह 48 तास अगोदर अर्ज करावा लागेल. तिकिट ट्रान्सफर करण्याची मुभा ही काउंटर तिकिटासह ऑनलाईन तिकिटांवरही मिळते. 
 
संबंधित बातम्या : 

IRCTC च्या वेबसाईटवरुन तिकीट काढताना Aadhaar आणि PAN समोर ठेवा, कारण...

कोरोनात नोकरी गमावलेल्यांना सरकारचा मोठा दिलासा, PF बाबत मोठी घोषणा