कोरोनाचा पहिला डोस घेतला तरीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण, एम्स रुग्णालयात भरती

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी सायंकाळी म्हणजे 19 एप्रिलला रीपोर्ट मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्सच्या सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Updated: Apr 19, 2021, 09:09 PM IST
कोरोनाचा पहिला डोस घेतला तरीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण, एम्स रुग्णालयात भरती title=

दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी सायंकाळी म्हणजे 19 एप्रिलला रीपोर्ट मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्सच्या सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची लवकरात लवकर चाचणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मनमोहन सिंग (Manmohan Singh) आणि त्यांची पत्नी गुरशरण कौर यांनी 4 मार्चला एम्समध्ये कोरोनाची पहिली लस घेतली आहे. म्हणून अशी आशा आहे की, ते सहजपणे कोरोनाला हरवू शकतील आणि लवकरच त्यांची प्रकृती चांगली होईल. मिळालेल्या माहितीनुसार 88 वर्षीय मनमोहन सिंग यांना हृदयविकाराचा आजार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत चांगल्या उपचारांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस त्यांना एम्समध्ये दाखल केले गेले आहे.\\

24 तासांपूर्वी पंतप्रधान मोदींना पत्र

मनमोहन सिंग यांनी एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून कोरोना साथीला पराभूत करण्यासाठी पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी कोरोना साथीपासून वाचण्यासाठी 5 योजना सांगितल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारने जास्तीत जास्त भर लसीकरण मोहिमेकडे द्यावे असे त्यांनी सुचवले. त्याच बरोबर मनमोहन सिंग यांनी युरोपियन एजन्सी किंवा USFDAने मंजूर केलेल्या लसीला विना चाचणी परवानगी देण्याचेही सुचवले आहे.