Parle आणि Oreo मध्ये वाद, जाणून घ्या खरं कारण

पहिली सुनावणी 12 एप्रिलला आहे आणि आरोपांची शहानीशा करून कोर्टयावर निर्णय देईल.

Updated: Mar 8, 2021, 10:13 PM IST
Parle आणि Oreo मध्ये वाद, जाणून घ्या खरं कारण title=

मुंबई : ओरीयो बिस्किट (Oreo Biscuit) ही एक US-based Intercontinental Brands कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेत ही कंपनी 2011 मध्ये आली, तेव्हापासून त्याला ग्राहकांनी पसंती दर्शवली. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची Oreo ला पसंती आहे. आणि त्यामुळेच भारतीय बाजारात इतर बिस्किट कंपनीला मागे टाकून Oreo ने आपली मजबूत पकड बनवली आहे.

Parle ही एक भारतीय कंपनी आहे आणि गेली अनेक वर्षे भारतीय बाजारपेठेत तग धरून आहे. Parle ने Parle-G बरोबरच Hide & seek , Krackjack, Monaco सारखी इतर अनेक बिस्किट ग्राहकांसाठी बाजारात आणली. ज्यांना ग्राहकांनी पसंतही केले, पण असे काय झाले, ज्यामुळे Oreo आणि Parle हे एकमेकांच्या विरुध्द कोर्टात येऊन उभे राहिले?

खरंतर Oreo ने Parle च्या बाजारात नवीन आलेल्या Fabio या बिस्किटाच्या डिजाइनवर आक्षेप घेतला आहे. Oreo कंपनीच्या म्हणण्यानुसार Fabio हा हुबेहुब Oreo बिस्किटसारखा आहे, एवढंच काय तर त्याचे Packaging सुद्धा Oreo बिस्किटसारखे आहे. 

Oreo बिस्किटाचं लूक एका सँडविच बिस्किटाप्रमाने आहे.  त्याचं पॅकेजिंग डिजाइन निळ्या (Blue) रंगाचे आहे. त्याच्याच सारखे सँडविच बिस्किट आणि निळ्या (Blue) रंगाच्या कागदात Pack केलेले Fabio बिस्किटचे डिजाइन आहे. त्यामुळे Copy Rights च्या अंतर्गत Oreo ने Parle वर गुन्हा दाखल केला आहे. 

या विरोधात Oreo कंपनीने Parle वर  दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) याचिका दाखल केली आहे.  या बद्दलची पहिली सुनावणी 12 एप्रिलला आहे आणि आरोपांची शहानीशा करून कोर्टयावर निर्णय देईल. दोन्ही कंपनीकडून याबाबत अजून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

तुम्ही जर Oreo किंवा Parle Fabio चे फॅन असाल तरी हताश होऊ नका, निर्णय कोणाच्याही बाजूने लागूदे बिस्किटाची पॅकेजिंग जरी बदलली तरी त्याची चव मात्र तिच राहाणार आहे.