Optical Illusion : ओळखा पाहू या फोटोत कुठे लपलीये छोटीशी पाल

या फोटोमध्ये अशी एक गोष्ट लापलीये जी शोधणं केवळ अशक्य वाटतं पण ज्यांची निरीक्षण क्षमता छान आहे त्यांना मात्र ही छोटीशी गोष्ट लगेच दिसून येईल 

Updated: Nov 22, 2022, 06:01 PM IST
Optical Illusion : ओळखा पाहू या फोटोत कुठे लपलीये छोटीशी पाल  title=

Opticall Illusion find lizard from photo: ऑप्टिकल इल्युजन हे खूपच मजेदार असते. हे असे काही फोटो किंवा व्हिडीओ (optical illusion photo and video) असतात, जे आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला विचार करायला भाग पाडतात. तसे पाहाता आपल्या मेंदूला रोजरोज तेच काम करण्याची सवय झाली असते, ज्यामुळे आपल्या मेंदूला थोडा चालना देण्याची गरज असते, ज्यामुळे तो काही क्रिएटीव्ह विचार (creativity) करु शकेल. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहेत, जो ऑप्टिकल इल्युजनशी संबंधीत आहे आणि तो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. (Optical Illusion find out small lizard from this photo only clever people can find )

असे म्हटले जाते की ऑप्टिकल भ्रम एकाग्रता आणि निरीक्षण कौशल्ये वाढविण्यात मदत करतात. तुमच्या निरीक्षण कौशल्याची चाचणी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. चाल तर तुमची निरीक्षण क्षमता कशी आहे याची एक छोटीशी टेस्ट घेऊया. 

सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूप व्हायरल होत आहे त्याची सगळीकडे खूप चर्चा होतेय. कारण या फोटोमध्ये अशी एक गोष्ट लापलीये जी शोधणं केवळ अशक्य वाटतं पण ज्यांची निरीक्षण क्षमता छान आहे त्यांना मात्र हि छोटीशी गोष्ट लगेच दिसून येईल 

फोटोमध्ये दडलंय काय ? 

व्हायरल (viral) होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्हाला भिंत दिसतीये आणि बागेचा परिसरसुद्धा..आता या फोटोमध्ये एक पाल लपलीये (hidden lizard) जी तुम्हाला शोधून काढायची आहे  आणि यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ 15 सेकंद.. पण केवळ 2 टक्केच लोक याच उत्तर देऊ शकले आहेत.  (Optical Illusion find out small lizard from this photo only clever people can find )

तुम्ही 15 सेकंदात शोधलीत का पाल ?

ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज तुमच्या ब्रेनला बूस्ट करण्याचं काम करतं. पाल चुटकन इकडून तिकडे जाते त्यामुळे तिला शोधणं किंवा सहज हाती सापडत नाही अश्यावेळी जरा नीट लक्ष देऊन पाहा आणि शोध काढा कि नेमकी कुठे लपलीये हि पाल.. 

हे घ्या उत्तर 

जर खूप डोकं लावूनसुद्धा तुम्हाला पाल सापडली नसेल तर चला एकत्र शोधूया...खाली दिलेल्या फोटोत उजवीकडे कोपऱ्यात नीट नजर घातलीत तर तुम्हाला पाल दिसून येईल... 

कधी कधी उत्तर आपल्यासमोर असत पण ते आपल्याला कळतसुद्धा नाही, अशातच आपली फसगत होते पण हीच खरी गमंत असते अश्या प्रकारच्या ऑप्टिकल इल्युशन फोटोंमध्ये..इथेच आपल्या बुद्धीचा खरा कस लागतो