विरोधकांना कलम 370 चा निर्णय उलटवायचा आहे - पीएम मोदी

पंतप्रधान मोदींची बिहारमध्ये विरोधकांवर टीका

Updated: Oct 23, 2020, 12:03 PM IST
विरोधकांना कलम 370 चा निर्णय उलटवायचा आहे - पीएम मोदी title=

सासाराम : पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर विरोधकांना लक्ष्य केलं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 एनडीए सरकारने हटवलं. पण विरोधकांना या निर्णय उलटवायचा आहे. अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.

पीएम नरेंद्र मोदींनी म्हटलं की, 'आमच्या सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. पण आता हे लोकं याला उलटवण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधक म्हणतायंत की, सत्तेत आल्यानंतर ते पुन्हा कलम 370 लागू करतील. यांनी कोणाचीही मदत घेतली तरी देश मागे हटणार नाही.'

पीएम मोदींनी म्हटलं की, 'त्यांना सत्तेतून खाली आणलं तर या लोकांना आता काय करावे असं झालं आहे. राजदने 10 वर्ष यूपीए सरकारचा भाग असताना बिहारच्या लोकांवर राग काढला. राजदने नीतीशकुमारांचे 10 वर्ष बेकार केले. जेव्हा नंतर 18 महिन्यासाठी सरकार बनली. तेव्हा परिवाराने काय-काय खेळ नाही खेळले हे सगळ्यांना माहित आहे. जेव्हा नितीशजींना ही गोष्ट कळाली त्यांनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला. बिहारच्या भविष्यासाठी आम्ही पुन्हा नितीशजी सोबत आलो. मी पंतप्रधान झाल्यानंतर बिहार आणि दिल्ली सरकारने तीन वर्ष एकत्र काम केलं. आता आमचं सरकार आत्मनिर्भर बिहारचं निर्माण करणार आहे.'