Government jobs: राज्यात सरकारी नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी ही शेवटची तारीख

३८,६००-१२२८०० रुपयांपर्यंत वेतन...

Updated: Mar 2, 2020, 01:39 PM IST
Government jobs: राज्यात सरकारी नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी ही शेवटची तारीख title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पदवीधर लोकांसाठी पोलीस सब इन्स्पेक्टर, असिस्टेंट सेक्शन ऑफिसर आणि स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पदांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) महाराष्ट्र लोकसेवा आयोगद्वारे (MPSC) या पदांसाठी भरती सुरु केली आहे. या पदांसाठी आवश्यक योग्यता पूर्ण करणारा उमेदवार १९ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतो.

भरतीाबाबत -

पदं - पोलीस सब इन्स्पेक्टर, असिस्टेंट सेक्शन ऑफिसर आणि स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर 
पदांची संख्या - ८०६
पात्रता - कोणत्याही विषयात पदवीधर 
वेतन - ३८६०० - १२२८०० 
वयोमर्यादा - १८ ते ४३ वर्ष (१ जून २०२०च्या आधारे जन्मतारखेची गणना)

येथे करा ऑनलाईन अर्ज 

परीक्षा फी -

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या विना आरक्षित वर्गातील उमेदवाराला ३७४ रुपये परीक्षा फी भरावी लागेल. आरक्षित वर्गातील उमेदवाराला २७४ रुपये फी जमा करावी लागेल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारेही फी भरता येऊ शकते.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०२० आहे. 
फी भरण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२० आणि
लेखी परीक्षेची तारीख ३ मे २०२० आहे.

या भरतीाबाबत, परिक्षेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग वेबसाईटवर https://www.mpsc.gov.in/ माहिती घेऊ शकतात. या परिक्षेत उमेदवाराची निवड लिखित परिक्षा आणि मुलाखतीच्याआधारे केली जाणार आहे.