अवघ्या ५ रुपयांत २१ वाहिन्या, 'या' कंपनीची ऑफर

टाटा स्कायच्या वेबसाईटवर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Updated: Feb 11, 2019, 04:35 PM IST
अवघ्या ५ रुपयांत २१ वाहिन्या,  'या' कंपनीची ऑफर  title=

मुंबई : सतत खंडीत होणाऱ्या केबलसेवेमुळे  ग्राहकांच्या केबलचालकाबद्दल अनेक तक्रारी असतात. अशा अनेक तक्रारींवर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नवे नियम लागू केले आहेत. 

या नियमांमुळे ग्राहकाला आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडण्याच्या अधिकार मिळाला आहे. याआधी फक्त एका वाहिनीसाठी संपूर्ण पॅक खरेदी करावा लागायचा. 'ट्राय'ने नवे नियम लागू केल्यानंतर संबंधित वाहिनीने आपल्या समुहाच्या सर्व वाहिन्यांचे पॅक ठराविक किंमतीत देण्यास सुरुवात केली आहे. टाटा स्कायने ५ रुपयांमध्ये २१ वाहिन्या देऊ केल्या आहेत. यात एचडी आणि एसडी चॅनेलचा समावेश आहे.  यातील २१ चॅनेलपैकी ९ चॅनेल हे एचडी आहेत. याशिवाय ग्राहक आपल्या आवडीनुसार संगीत वाहिनी (एचडी ), क्रिकेट इंग्लिश (एचडी), माहिती आणि मनोरंजन करणाऱ्या वाहिन्या (लघू एचडी), मनोरंजन (एचडी) ची निवड करु शकणार आहे. इंग्रजी सिनेमा आणि कार्टून वाहिन्यांसाठी ग्राहकांना स्वतंत्र पॅक घ्यावा लागणार आहे. टाटा स्काय या वाहिन्यांसाठी दरमहा शुल्क आकारणार आहे. 

'बीजीआर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, टाटा स्कायच्या वेबसाईटवर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पॅकसाठी जे दर आहेत. त्या दरांमध्ये टॅक्सही आकारलेला आहे.  त्यामुळे टाटा स्कायच्या क्रिकेट हिंदीचा एचडी पॅक ४२ रुपयांमध्ये आहे. ही किंमत फक्त क्रिकेटच्या हिंदी वाहिन्यांसाठी आहे. कंपनीने स्वतंत्रपणे  अॅड ऑन पॅक (अतिरिक्त वाहिन्यांसाठी) असा पर्याय देखील उपलब्ध करुन दिला आहे.  या पॅकला टाटा स्काय 'मिनी पॅक' म्हणून ओळखले जाते.

प्रादेशिक वाहिन्यांसाठी ग्राहकांना ७ रुपयांचे पॅकेज घ्यावे लागणार आहे. यात एकूण १४ प्रादेशिक वाहिन्यांचा समावेश असणार आहे. यात मराठी,  गुजरात, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि ओडिया या भाषेतील  वाहिन्यांचा समावेश आहे. एचडी आणि एसडी आणि रिजनल पॅक १५३ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे.