'या' रेल्वे स्थानकावर 1 हजार किलो कुत्र्याचं मांस जप्त

 कुत्रा हा आपल्याकडे खाण्याचा पदार्थ नाही हे माहित असताना देखील केवळ स्वस्तात उपलब्ध म्हणून याच्या मांस विक्रीतून लाखोंची उलाढाल

& Updated: Nov 18, 2018, 12:11 PM IST
'या' रेल्वे स्थानकावर 1 हजार किलो कुत्र्याचं मांस जप्त  title=

चेन्नई : कोणी तुम्हाला हॉटेलमध्ये कुत्र्याचं मांस खाऊ घातलं तर ? किती संतापजनक असेल ना ?  कुत्र्यांचे मांस वापरले जात असल्याच्या घटना याआधी अनेकदा समोर आल्या आहेत. या संदर्भातील जुने व्हिडिओही पुन्हा पुन्हा व्हायरल होताना दिसतात.  रस्त्यावरील चायनीज गाड्यांवर चिकन ऐवजी कुत्र्याचे मांस देण्याचे प्रकार जास्त प्रमाणात समोर आले आहेत. कुत्रा हा आपल्याकडे खाण्याचा पदार्थ नाही हे माहित असताना देखील केवळ स्वस्तात उपलब्ध म्हणून याच्या मांस विक्रीतून लाखोंची उलाढाल केली जाते. असाच काहीसा गंभीर प्रकार नुकताच समोर आलायं.

नॉनव्हेज खाणाऱ्यांना धक्का 

अनेक ठिकाणी हॉटेलात कुत्र्याचं मांस वापरल्याच्या अफवा येतात पण येथे खरोखर एवढ्या मोठ्या प्रमाणात मास सापडलं आहे. दक्षिणेत कुत्र्याचं मासं खातात हे ऐकिवात नाही. आसाम, त्रिपुरात काही लोक खातात असं म्हटलं जातं. पण चेन्नईत एवढ्या मोठ्या प्रमाणात मास सापडल्याची बातमी नवभारत टाईम्सने दिली आहे.

नॉनव्हेज खाणार्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे. दक्षिण, पश्चिम आणि उत्तर भारतात कुत्र्याचं मांस खाण्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही.

तुम्हाला वाटेल ही घटना मुंबईतील आहे पण ती मुंबईतली नाही.

मांस जप्त  

चेन्नईच्या एग्मोर रेल्वे स्थानकात 1 हजार किलोग्रॅम कुत्र्याचे मांस जप्त करण्यात आलंय. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलीयं.

यातील सॅंपल काढून तपासणीसाठी पाठविण्यात आलायं. जोधपुर एक्सप्रेसमधून हे मांस जप्त करण्यात आलंय.