एकतर्फी प्रेमातून तरुणाचा भलताच प्रताप, तरुणीचे कुटुंबीय साखरझोपेत असताना घराला लावली आग

Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणाने चक्क मुलीच्या घरालाच आग लावल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 26, 2023, 04:57 PM IST
एकतर्फी प्रेमातून तरुणाचा भलताच प्रताप, तरुणीचे कुटुंबीय साखरझोपेत असताना घराला लावली आग title=
One Sided Love Lover Sent His Friends To Set Fire To The Girl House In delhi

Crime News In Marathi: एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) भयानक गुन्हे घडत असल्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. पुण्यातही (Pune) एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकुहल्ला केल्याची घटना ताजी आहे. अनेकदा एकतर्फी प्रेमातून जीव घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यातच दिल्लीतील एनसीआर येथे एक अजब घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घराला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणी तिच्या कुटुंबासह रात्री घरात झोपली असतानाच ही घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे. (Love Affair News)

१९ जुलैची ही घटना आहे. मध्यरात्री 3च्या सुमारास पीडित मुलीचा संपूर्ण कुटुंब घरात झोपले होते. त्याचवेळी बाईकवर आलेल्या दोन तरुणांनी घराच्या गेटवर पेट्रोल टाकून आग लावली. सुदैवाने मुलीच्या कुटुंबीयांना वेळीच घटनेबाबत माहिती मिळाली आणि ते घराबाहेर पडले. शेजाऱ्यांच्या मदतीने लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. नेमकी आग कशी लागली हे मात्र कोणालाच कळत नव्हते. ज्यावेळेस सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हाच या घटनेचा खुलासा झाला. त्यांनंतर कुटुंबीयांनी या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार एक मुलगा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलीला त्रास देत होता. त्याच्या मित्रांनीही मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सीसीटीव्हीत दिसत असलेले मुलं हे आरोपी मुलाचे मित्र असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेत आरोपींचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुरावे ताब्यात घेतले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्रामचे पोलिस एसीपी क्राइम वरुण दहिया यांनी म्हटलं आहे की, आरोपींनी 19 जुलै रोजी रात्री 3च्या सुमारास गेटवर पेट्रोल टाकून आग लावली. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. घराबाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी जप्त केले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. तसेच आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.