लव्ह, सेक्स अन् धोका! एका व्यक्तीची तीन लग्न, अनैसर्गिक सेक्स...; नात्याला काळिमा फासणारा प्रकार

Crime News Today: पतीचे पहिले लग्न झाले तरीदेखील महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् दुसरे लग्न केले. दुसऱ्या लग्नाचा हा संसारही फार काळ टिकला नाही.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 8, 2024, 11:45 AM IST
लव्ह, सेक्स अन् धोका! एका व्यक्तीची तीन लग्न, अनैसर्गिक सेक्स...; नात्याला काळिमा फासणारा प्रकार title=
One man does three marriages and unnatural sex Second wife files FIR

Crime News Today: अनैतिक संबंधांतून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका युवकाने तीन लग्न केल्याची घटना घडली आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर या तरुणाने दुसरं लग्न केलं. मात्र, त्यानंतरही तो तिसऱ्याच एका महिलेसोबत राहू लागला. पतीच्या या वर्तनाला वैतागलेल्या पत्नीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

पतीच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे असं सांगून त्याने माझ्यासोबत लग्न केले. मात्र, आता तो तिसऱ्या पत्नीसोबत राहतो. त्याचबरोबर महिलेने अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचाही आरोप केला आहे.

लल्ला सिंह असं या तरुणाचे नाव आहे. लल्ला सिंह स्वतःचे एक रुग्णालय चालवतो. पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे असं सांगून त्याने दुसऱ्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यासोबत लग्न करुन काही महिने एकत्र राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो सतत तिला मारहाण करायचा तसंच, तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारदेखील करायचा. इतकंच नव्हे तर, त्याने दुसऱ्या पत्नीचा जबरदस्ती गर्भपातदेखील केला. दुसऱ्या पत्नीला जेव्हा त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल कळले तेव्हा तिने कोर्टाचे दरवाजा ठोठावले. भत्ता मिळवण्यासाठी तिने कोर्टाची पायरी चढली. यावरुन त्यांच्यात वाद झाले आणि पतीने तिला घराबाहेर काढले. 

पत्नीला घराबाहेर काढल्यानंतर तो तिसऱ्याच एका महिलेसोबत राहू लागला. दुसऱ्या पत्नीला जेव्हा याबाबत माहिती झाले तेव्हा तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणी तपास करत असून पुढील कारवाई करणार आहेत. या प्रकरणी आरोपीच्या दुसऱ्या पत्नीने कोर्टातही दाद मागितली आहे.  

लल्ला सिंह याने फसवल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीने कोर्टात पोटगीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्याचदरम्यान, लल्ला सिंह याने तिसऱ्याच महिलेसोबत लग्न केले असून तो आता तिच्यासोबत राहत असल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्याने तिसऱ्या पत्नीलाही दुसऱ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून फसवले आहे. 

दरम्यान, दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार या धोकेबाज पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी साउथ विभागच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे. आरोप आहे की, रुग्णालयाच्या संचालकाने पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून दुसरं लग्न केले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीला मारहाण करुन घरातून बाहेर काढलं. नंतर दुसऱ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून तिसरे लग्न केले.