मुंबई: आपल्याकडे सर्वसामान्य एक समस्येपासून सर्वच त्रस्त आहेत आणि ती समस्या म्हणजे ट्राफिक जाम. कामावरून घरी जाताना एकदा का ट्राफिकमध्ये अडकलो की, झालं नुसता वैताग येतो. ट्राफिक जाममुळे अनेक समस्यांना सामोरे जायला होत. कधी कधी रुग्णांना हॉस्पिटल मध्ये जायला उशीर होतो कधी मुलांना शाळेत जायला उशीर होतो तर कधी ऑफिस मध्ये जायला सुद्धा उशीर होतो. (traffic problem in india)
हरियाणातील गुरुग्राममधून एक धक्कादायक आणि विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे. येथे एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत (labour pain to women) असल्याने तिला रुग्णालयात नेले जात होते, मात्र या महिलेची गाडी ट्रॅफिक जॅममध्ये अडकली (car stucked in traffic)आणि नंतर असा प्रकार घडला, की कुणाला अंदाजही आला नसेल. ट्रॅफिक जॅममध्ये महिलेने मुलाला जन्म दिला (woman gave birth to baby in traffic)
हरिणामधील जेकबपुरा येथील ही महिला प्रसूतीसाठी हॉस्पिटलला निघाली मात्र भयंकर ट्राफिक जाम चा तिला सामना करावं लागला जुन्या रेल्वे रोडवर जाम झाल्याने त्यांची गाडी अडकली.महिलेसह रुग्णालयात पोहोचू शकलो नाही.
ट्राफिक इतकं जाम होत की गाडी पुढे सरकण्याचा नाव घेत वेळ निघून गेला महिलेला वेदना अनावर होत होत्या आणि शेवटी वाटेतच दिला. गर्भवती महिलेने कारमध्येच मुलाला जन्म दिला. सुदैवाने त्या महिलेसोबत अंगणवाडी सेविका गाडीत हजर होत्या. प्रसूतीसाठी त्यांनी खूप मदत केली.
आई मुलाला रुग्णालयात दाखल
थोड्या वेळाने रस्ता क्लीअर झाला आणि या महिलेला आणि नवजात बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या दोघांची प्रकृती ठीक आहे.