Old Vehicle Policy: दिल्ली सरकार परिवहन विभागाद्वारे जप्त करण्यात आलेल्या खूप वर्षे जुन्या वाहनांसाठी नियम आणला जात आहे.यासाठी वाहन चालकांनी वाहतूक विभागाला शपथपत्र द्यावे लागणार आहे. ज्या वाहन चालकांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, त्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. दिल्ली परिवहन विभागाने एंड ऑफ लाइफ वाहन नितीला मंजुरी दिली आहे. ओव्हरएज म्हणून जप्त केलेली वाहने काही शुल्क घेऊन परत केली जाणार आहे.
पीटीआयला एका अधिकाऱ्याने हे वृत्त दिले आहे.30 हून अधिक कारचालकांनी तक्रार आणि याचिका केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये वाहतूक विभागाला महत्वाचे निर्देश दिले होते. त्यानुसार वाहनांच्या मालकांकडून वचनपत्र घेऊन पॉलिसी बनविण्याचे निर्देश देण्यात आले होते.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जप्त केलेली वाहने सोडली जाऊ शकतात. याअंतर्गत दुचाकींसाठी 5 हजार रुपये आणि चार चाकींसाठी 10 हजारपर्यंत दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे.
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर जुनी वाहने चालवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यावर जप्ती आली आहे. ही वाहने सोडवून घेण्यासाठी वाहन चालकांना शपथपत्र द्यावे लागेल. जुनी वाहने सार्वजनिक ठिकाणी पार्किंग अथवा रस्त्यावर चालविणार नाही, असे त्यात नमूद करावे लागेल.
तसेच जुन्या गाड्यांची डागडुजी करताना वाहतूक विभागाला सूचित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. वाहनाची ने-आण करण्यासाठी लॉरीचा उपयोग करण्याचेही यात म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांत अंमलबजावणी पथकांनी मोठ्या प्रमाणात जुनी वाहने जप्त केली होती. यातील अनेक वाहने स्क्रॅपही झाली आहेत. जप्त केलेली वाहने सोडण्याचे आदेशही वाहतूक विभागाला देण्यात आले. यामुळे लोकांना त्यांच्या वाहनांची दिल्लीबाहेर नोंदणी करता येणार आहे. नवीन धोरणांतर्गत, आधीच जप्त केलेली वाहने प्रतिज्ञापत्र / हमीपत्रासह सोडण्याची तरतूद देखील केली जाईल. ही वाहने इतर राज्यांमध्ये नोंदणीकृत करण्याचे आणि या कालावधीत दिल्लीच्या रस्त्यावर वाहने उभी न करण्याचे किंवा वाहन चालवू नये, असे हमीपत्र मालकांनी या अटीवर सोडले जाणार आहे.