आधार कार्ड लिकिंगच्या कामातून 'या' लोकांना मिळणार सूट

पॅन कार्ड, सीमकार्ड आणि बॅंक अकाऊंट हे आधार कार्डासोबत लिंक करा अन्यथा या तिघांचाही वापर अवैध ठरवला जाईल. असा सरकारचा आदेश आहे.

Updated: Nov 19, 2017, 12:11 PM IST
आधार कार्ड लिकिंगच्या कामातून 'या' लोकांना मिळणार सूट  title=

मुंबई  : पॅन कार्ड, सीमकार्ड आणि बॅंक अकाऊंट हे आधार कार्डासोबत लिंक करा अन्यथा या तिघांचाही वापर अवैध ठरवला जाईल. असा सरकारचा आदेश आहे.

भारतीयांची त्यासाठी होणारी तारांबळ आणि लांबच लांब रांग पाहून त्याच्या डेडलाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत.  

आधार लिंकिंगच्या या सक्तीमधून मात्र काही लोकांची सुटका करण्यात आली आहे.  एनआरआय, पीआईओ आणि ओसीआई  असणार्‍यांना आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती नाही.  

कोणाला मिळणार सूट ? 

युआयडीने एनआरआय लोकांना आधार कार्ड लिंकिंगपासून दूर ठेवले आहे. तरीही त्या लोकांची ओळख तपासून पाहिली जाणार आहे. त्यासाठी दुसरी यंत्रणा कार्यरत आहे. तसेच सूट दिलेल्या व्यक्ती खरंच एनआरआय आहेत का ? हेदेखील तपासून पाहिले जात आहे. 

मनी लॉन्ड्रिंग रोखायला मदत 

२१ ऑक्टोबर रोजी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेची खाती आणि आधार कार्ड यांचे लिंकिंग अनिवार्य केले होते. हा भारत सरकारचा नियम असल्याने त्याद्वारा मनी लॉड्रिंगवर नियंत्रण ठेवनं सुकर होणार आहे.