न्यू यॉर्क : अमेरिकी उद्योग सम्राट इलोन मस्क यांच्या मंगळावर मानवी वस्ती करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून मानले जाणारे जगातले सर्वात शक्तिशाली रॉकेट अमेरिकेच्या फ्लोरिडा भागातून अंतराळात झेपावलं.
या रॉकेटसोबत एक स्पोर्टसकारही मंगळावर पाठवण्यात आलीय. जगभरात पहिल्यांदाच एका खासगी कंपनीनं आंतराळ उड्डाण यशस्वी केलं. इलोन मस्क यांच्या कंपनीनं फाल्कन हेवी हे प्रचंड शक्तिशाली अवकाश यान भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे दोन वाजून पंचवीस मिनिटांनी आकाशात सोडलं.
हे अवकाश यान 23 मजली इमारतीएवढं उंच आहे. मानवरहित असलेल्याया अवकाश यानामुळे भविष्यात खासगी अवकाश कार्यक्रमांना अवकाश खुलं झालं आहे.