नवी दिल्ली : नोटबंदीनंतर नव्याने ५०० आणि २०००च्या नोटा चलनात आल्यात. आता एक रुपयाची नोट चलनात येणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच एक रुपयाची नोट चलनात आणली जाणार आहे. आरबीआयने यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. भारत सरकारकडून एका रूपयाच्या नव्या नोटेची छपाई पूर्ण झाली आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.
नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या चलनात असलेल्या एक रूपयाच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत. नव्या नोटेच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, केवळ रंग बदलण्यात आला आहे.
नव्या नोटेच्या पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजुंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. जवळपास दोन दशकांपर्यंत एक रुपयांच्या नोटेवर बंदी ठेवल्यानंतर २०१५ साली या नोटा पुन्हा बाजारात आणण्यात आल्या.