मुंबई : SARS-CoV-2या व्हायरसच्या स्ट्रेन लोकांमध्ये चिंतेचं कारण बनला आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असे म्हटले आहे की, आतापर्यंत असा कोणताही कोरोना व्हेरिएंट समोर आलेला नाही, ज्यामुळे लसीचा प्रभाव कमी होतो. डब्ल्यूएचओचे महासंचालक टॅड्रोस ऐडरेनॉम गॅबरेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले की, भविष्यात असेच होईल याची शाश्वती देता येणार नाही. कारण हा व्हायरस पुढे आणखी कोणते रुप घेईल हे ही सांगता येणार नाही.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टॅड्रोस 74 व्या जागतिक आरोग्य असेंब्लीमध्ये म्हणाले, "कोरोनाचा असा कोणताही प्रकार अद्याप समोर आला नाही, जो लस डायग्नोसिस या उपचारांचा परिणाम कमी करतो. परंतु याक्षणी, याची कोणतीही शाश्वती देऊ शकत नाही की, हे असेच राहिल कारण व्हायरसच्या रूपांत सतत बदलत होत आहेत."
डब्ल्यूएचओचे महासंचालक म्हणाले की, लोकांना लस घेण्यास मागे हटू नये. तसेच सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जावी. टॅड्रोस ऐडरेनॉम यांनी या सभेमध्ये सदस्य देशांना सप्टेंबरपर्यंत किमान 10 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यास सांगितले. त्याचबरोबर एकूण लोकसंख्येच्या किमान 30 टक्के लोकांना वर्षाच्या अखेरीस लसीकरण करण्याची विनंती केली आहे.
लसीच्या कमतरतेवर डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी वैल-ऑफ सदस्य असलेल्या देशातील मुलांचे लसीकरण थांबवावे आणि ज्यांना सर्वात जास्त लसीकरण करण्याची आवश्यक आहे. अशा देशांना लसी द्यावा असे आवाहन केले आहे. डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी लसीचा अधिक साठा असलेल्या देशांना ही लस इतर देशांमध्येही देण्याचे आणि लसीचे उत्पादन आणि वितरण वाढविण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.