Nitin Gadkari: गडकरी म्हणतात विहिरीत उडी देईन मात्र काँग्रेस मध्ये जाणार नाही !

नागपुरात बोलत असताना त्यांनी एकाच दगडाने दोन पक्षी मारले आहेत. गरज संपल्यावर त्याला फेकून देऊ नका असं त्यांनी म्हटलं आहे.

Updated: Aug 28, 2022, 04:40 PM IST
Nitin Gadkari: गडकरी म्हणतात विहिरीत उडी देईन मात्र काँग्रेस मध्ये जाणार नाही ! title=

अमर काणेनागपूर : भाजपच्या संसदीय मंडळातून काढून टाकल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) चर्चेत आहेत. नागपुरात उद्योजकांच्या एका समिटला संबोधित करत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक किस्सा सांगताना म्हटले की, मला  माझे मित्र काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती, मात्र मी विहिरीत उडी मारेल, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही.  कारण मला काँग्रेस पक्षाची विचारधारा आवडत नाही असा स्पष्ट नकार दिल्याच सांगितले.

उद्योजकांना संबोधित करताना प्रत्येकाने व्यवसाय करताना ह्युमन रिलेशनशिप नेहमीच जोपासली पाहिजे असेही नितीन गडकरी म्हणाले. कुणाचे  वाईट दिवस, वा चांगले दिवस असो. एकदा कोणाचा हात धरला की त्याची साथ सोडू नका, उगवत्या सूर्याची पूजा करू नका असे सांगत आपल्या तरुण वयात मिळालेल्या या ऑफरचा  किस्सा त्यांनी सांगितला. 

यावेळी नितीन गडकरींनी तरुण उद्योजकांनी यशस्वी होण्याकरता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील 'माणूस युद्धभूमीत हरला की संपत नाही, तर तो युद्धभूमी सोडल्यावर संपतो' ही लाईन नेहमीच  लक्षात ठेवावी असं सांगितलं.

नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळातून यंदा वगळण्यात आलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. गरज संपल्यानंतर कोणालाही फेकून देऊ नका या वक्तव्यामुळे देखील त्यांना हा भाजपला इशारा दिला आहे का अशी देखील चर्चा रंगली आहे.