नीता अंबानींनी कवितेतून मांडली आकाश-श्लोकाची प्रेमकहाणी!

आकाश अंबानी लवकरच आपली बालमैत्रिण श्लोका मेहतासोबत विवाहबद्ध होणार आहे

Updated: Mar 29, 2018, 12:15 PM IST
नीता अंबानींनी कवितेतून मांडली आकाश-श्लोकाची प्रेमकहाणी! title=

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलगा आकाश अंबानी लवकरच आपली बालमैत्रिण श्लोका मेहतासोबत विवाहबद्ध होणार आहे. २४ मार्चला गोव्यात यांची प्री इन्गेजमेंट सोहळा रंगला. त्यानंतर अंबानी परिवाराने मुंबई स्थित एंटीलियामध्ये आकाश आणि श्लोकासाठी ग्रॅंड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. यामुळे आकाश आणि श्लोकाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

नवीन सुनेसाठी कविता 

आकाश आणि श्लोका लहानपणापासूनचे मित्र आहेत. मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये (DAIS) दोघे एकत्र शिकले आहेत. श्लोका मेहता ही हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. श्लोहा आणि आकाश यांच्यावर नीता अंबानी यांनी सुंदर कविता केली आहे. यातून आकाश-श्लोकाच्या नात्याची खोली जाणवते. आकाश-श्लोकाच्या शालेय दिवसांच्या आठवणी जागवत त्यांचा आतापर्यंतचा प्रवास नीता अंबानी यांनी कवितेत मांडला आहे.

मुंबईत होणार साखरपुडा

दोघांचा साखरपुडा डिसेंबरमध्ये मुंबईत होणार आहे. आणि डिसेंबरमध्येच दोघांचे लग्न होईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाची तारीख ठरली आहे. ८-१२ डिसेंबर या दरम्यान हा सोहळा पार पडणार आहे. 

४ मार्चला आली लग्नची बातमी

न्यूज एजेंसी पीटीआयने ४ मार्चला आकाश-श्लोकाच्या लग्नाची बातमी दिली. तेव्हा दोन्ही परिवाराकडून या बातमीला कोणताही दुजोरा देण्यात आला नव्हता. पण २४ मार्चला यांची प्री इन्गेजमेंट सोहळा झाला आणि या बातमीवर शिक्कमोर्तब झाले.