मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. त्यांच्या एकूण संपत्ती विषयी तर सगळ्यांना ठावूक आहे. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या नेहमीच त्यांच्या लक्झरी लाइफमुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस झाला. पण तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता की जेव्हा नीता या बसने प्रवास करायच्या. चला तर आज नीता अंबानी यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...
मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि उद्योगपती नीता अंबानी यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1963 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रवींद्र भाई दलाल आणि आईचे नाव पूर्णिमा दलाल होते. नीता यांनी नरसी मोंजी कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. नीता तरुण वयातच प्रोफेश्नल भरतनाट्यम कलाकार बनल्या. नीता एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या, त्यादरम्यान त्यांची भेट मुकेश अंबानी यांच्याशी झाली. हळूहळू या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1985 मध्ये दोघांनीही सर्वांच्या संमतीने लग्न केले. मुकेश आणि नीता अंबानी यांना आकाश, अनंत आणि ईशा अंबानी अशी तीन मुले आहेत. आज नीता आपल्या पतीचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. याशिवाय त्या अनेक स्वयंसेवी संस्थांसोबतही काम करत आहे.
नीता यांना महागडे कपडे, दागिने, ब्रँडेड हँडबॅग आणि सॅन्डल्स आवडतात. शूज, लिपस्टिक, मेकअप अशा अनेक गोष्टी आहेत. नीताचे कपडे आणि हँडबॅगच नाही तर त्यांची लिपस्टिकही खास ऑर्डर देऊन बनवली जाते, ज्याची किंमत 40 लाख रुपयांपासून सुरू होते. इतकेच नाही तर त्यांच्याकडे प्रत्येक कपड्यावर मॅचिंग सँडल देखील आहेत, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 'सॅन लॉरॉन' हा नीता अंबानींचा आवडता ब्रँड आहे. 'ईशा अंबानी पिरामल'च्या फॅन पेजवर नीता अंबानींच्या शू कलेक्शनची माहिती देण्यात आली आहे. नीता अंबानींना ब्रँडेड घड्याळे आणि बॅग आवडतात.
नीता यांच्या दिवसाची सुरुवात साध्या चहाने होत नाही तर त्यांची एक स्पेशल हेल्थी चह आहे. या चहाची किंमत 3 लाख रुपये आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्या सोन्याने जडलेली जपानमधील सर्वात जुनी क्रॉकरी ब्रँड नोरिटेकच्या कपमध्ये चहा पितात.