Nita Ambani नींची धाकटी बहीण सर्वसामान्याप्रमाणे जगते आयुष्य; SRK, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन

मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. नीता अंबानी त्यांच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखल्या जातात. असं असतानाच दुसरीकडे त्यांची बहीण मात्र फारस सर्वसमान्यांप्रमाणे आयुष्य जगते.

Updated: Jan 14, 2023, 03:51 PM IST
Nita Ambani नींची धाकटी बहीण सर्वसामान्याप्रमाणे जगते आयुष्य; SRK, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन title=
Nita Ambani Sister mamta dalal

Nita Ambani Younger Sister: उद्योजक मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) दबदबा केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. मुकेश अंबानी यांचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होते. ते आणि त्यांची पत्नी नीता अंबानी (Mukesh and Nita Ambani) यांची लोकप्रियता एखाद्या सुपरस्टारहूनही अधिक असल्याचं म्हटलं जातं. मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानी या त्यांच्या ग्लॅमरस लूक आणि लाइफस्टाइलसाठी कायमच चर्चेत असतात. मात्र दुसरीकडे त्यांची बहीण मात्र फारच सर्वसमान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहे. 

नीता अंबानी लग्नानंतर अनेक वर्ष...

नीता अंबानींना एक छोटी बहीण (Nita Ambani Younger Sister) आहे हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. नीता अंबानींची ही बहीण त्यांच्याहून चार वर्षांनी लहान आहे. नीता अंबानी यांच्या छोट्या बहिणीचं नावं ममता दलाल असं आहे. ममता दलाल या ग्लॅमर आणि श्रीमंतीपासून कायमच दूर राहतात. त्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करतात. विशेष म्हणजे नीता अंबानीही लग्नाआधी शिक्षिकाच (Nita Ambani Teacher) होत्या. त्यांनी लग्नानंतरही बरेच वर्ष शाळेतील मुलांना शिकवण्याचं काम केलं. नीता अंबानी या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकही आहेत. 

SRK, तेंडुलकर कनेक्शन

नीता अंबानी (Nita Ambani School Name) यांची धाकटी बहीण ममता दलाल यासुद्धा धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करतात. केवळ शिक्षिका नाही तर ममता या शाळेच्या व्यवस्थापनासंदर्भातही सक्रीय आहेत. ममता दलाल यांनी एका मुलाखतीमध्ये, "मी शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुलांबरोबरच सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मुलांनाही शिकवलं आहे," असं म्हटलं होतं. ती सेलिब्रिटींची मुलं असली तरी माझ्यासाठी ते विद्यार्थीच आहेत, असंही त्या म्हणाल्या होत्या.