Nikhil Kamath Success Story: शेअर मार्केट (Share Market) प्रेमींना निखिल कामत (Nikhil Kamath) हे नाव चांगलंच माहित असेल. निखिल कामत या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही. निखिल कामत त्याच्या यशस्वी कल्पनेमुळे घराघरांत पोहचलेलं नाव आहे. स्वप्न उराशी बाळगून निष्ठेने पुर्ण केल्यामुळे निखिल कामत हे यशस्वी लोकांच्या यादीतलं नाव अशी देखील ओळख निर्माण झाली. चला जाणून घेऊया यशस्वी निखिल कामत (Nikhil Kamath).
निखिल कामत सांगतात की, एके दिवशी त्यांच्या वडिलांनी काही सेविंग्स त्यांना दिली आणि त्या सेविंग्सचे व्यवस्थापन करायला सांगितलं. मग काय त्या दिवसापासुन निखिल कामत (Nikhil Kamath) शेअर बाजारात उतरले. निखिल कामत याने वयाच्या १७व्या वर्षी स्कूल ड्रॉपआउट करुन शेअर मार्केट (Share Market) ट्रेडिंग करायला सुरुवात केली. बघता बघता त्या क्षेत्रात निखिल कामत पुढे निघुन गेला.
झीरोधाचे को-फाउंडर निखिल कामत यांनी हल्लीच ह्यूमंस ऑफ बॉम्बेला (Humans of Bombay) दिलेल्या मुलाखतीत व्यापारी प्रवास विस्तृतपणे उघड केला. त्या मुलाखतीत निखिल कामतने सांगितले त्याने पहिली नोकरी महिना 8000 रुपयांवर कॉल सेंटरमध्ये केली.
कोटींची सपंत्ती असणाऱ्या निखिल कामत यांना सुरुवातीला शेअर मार्केट (Share Market) ट्रेडिंगचे गांभीर्य नव्हते. एका वर्षातच त्यांना मार्केटचा चांगलाच अंदाज आला आणि मार्केटचं महत्तव समजलं. तेव्हापासुन त्यांनी गांभीर्याने शेअर मार्केट (Share Market) ट्रेडिंग विषय हाताळायला सुरुवात केली. आज ते अब्जाधीशांच्या यादीतलं एक प्रसिद्ध नाव आहे.
निखिल कामत सांगतात की, एके दिवशी त्यांच्या वडिलांनी काही सेविंग्स त्यांना दिली आणि त्या सेविंग्सचं व्यवस्थापन करायला सांगितलं. आणि हिच गोष्ट त्यांच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट ठरली. निखिल कामत यांनी सांगतलं की त्यांचे वडील त्यांच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवतात या विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी त्यांनी जवाबदारीने काम केलं. मग हळुहळु निखिल कामत यांची बाजारावर चांगलीच पकड बसली. कालांतराने निखिल कामतने त्याच्या मॅनेजरला देखील शेअर मार्केट (Share Market) मध्ये पैसे लावायला राजी केलं. मॅनेजरला फायदा झाल्यावर त्याने बऱ्याच लोकांना निखिलचा फंड घ्यायला तयार केले आणि त्या सगळ्यांनाच फायदा झाला.
झिरोधा कसं सुरु केलं याबाबत निखिल यांनी स्वतःच एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. निखिल सांगतात जेंव्हा ते नोकरीला होते तेंव्हा त्यांच्या सल्ल्याने अनेकांनी गुंतवणूक केली होती. स्वतः त्यांच्या मॅनेजरने त्यांची एवढी मार्केटिंग केलेली की, त्यांना ऑफिसमधील अनेकांचे पैसे मॅनेज करावे लागत होते. म्हणूनच त्यांनी ऑफिसमध्ये जाणं कमी केलेलं. या बदल्यात त्यांचे सहकारीच त्यांची हजेरी लावत असत. यानंतर निखिल यांनी बंधू नितीन कामत यांच्यासोबत कामत असोशिएटसची 2010 मध्ये सुरुवात केली अशाप्रकारे झीरोधाची स्थापना झाली.
निखिल कामतने त्या मुलाखतीत हे देखील सांगितलं, मला माझ्या संघर्षातून खुप काही शिकायला मिळालं. स्कूल ड्रॉपआउट ते कॉल सेंटरमध्ये काम करणे आणि परत ट्रू बीकन प्रवास हे संघर्ष माझ्या कामी आलं. त्यातून मला स्मरणात राहतील अशी शिकवण मिळाली. आज मी अब्जाधीश असलो तरी अजूनही काहीच बदलले नाही. मी आज ही फ्रेशर असल्यासारखं काम करतो. मला नेहमी असे वाटते की माझ्याकडुन काही सुटायला नको. निखिल कामत आज ही त्याची ऑडी स्वत: ड्राइव करतात आणि आयुष्य स्वत:च्या नियमांप्रमाणे जगतात.