धक्कादायक खुलासा : काश्मीरच्या अशांतीमागे पाकिस्तानचं फंडिंग

एनआयए अर्थात राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या सूत्रांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. 

Updated: May 31, 2017, 11:40 AM IST
धक्कादायक खुलासा : काश्मीरच्या अशांतीमागे पाकिस्तानचं फंडिंग  title=

नवी दिल्ली : एनआयए अर्थात राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या सूत्रांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. 

गेल्या वर्षी काश्मीरमध्ये हिजबुल कमांडर बुरहान वानी याला ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी फुटीरतावाद्यांना पाकिस्तानकडून फंडिंग केलं जात असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. 

तरुणांच्या हातात पेट्रोल बॉम्ब ठेऊन खोऱ्यातील जवळपास ५००० शाळा जाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. खोऱ्यातील मुलांना शाळेपासून दूर ठेवण्याची ही योजना होती. 

सोमवारी एनआयए मुख्यालयात तीन फुटीरतावाद्यांची चौकशी केल्यानंतर, वानीच्या एन्काउंटरनंतर खोऱ्यात पसरलेली अशांतता एक रचलेल्या कटाचा भाग होता. यासाठी पाकिस्तानी तंत्रांनी करोडो रुपये खर्च केलेत, हे उघड झालंय.

एनआईएनं फारुक अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, नईम खान आणि जावेद अहमद बाबा ऊर्फ गाजी यांची दीर्घकाळ चौकशी केली. आयएसआयकडून काही निवडक फुटीरतावाद्यांना चांगलीच रक्कम मोजली जाते, असंही त्यांनी उघड केलंय.

फुटीरतावाद्यांच्या हैदोसाचा आत्तापर्यंत जवळपास ५० शाळांना फटका बसलाय. काश्मीर खोऱ्यात जवळपास २४२६५ सरकारी आणि जवळपास इतक्याच खाजगी शाळा आहेत.