Two Wheeler Rules : दुचाकीवर लहान मुलांना बसवण्याआधी हे नियम जरुर वाचा

दुचाकीवर लहान मुलांना बसवत असतानाचे हे नियम वाचल्यानंतरच प्रवासाला लागा. कारण, हे नियम अतिशय महत्त्वाचे असे आहेत. 

Updated: Feb 17, 2022, 11:10 AM IST
Two Wheeler Rules : दुचाकीवर लहान मुलांना बसवण्याआधी हे नियम जरुर वाचा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक रस्त्यांवर असणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. चार चाकी वाहनांच्या तुलनेत तरुणाईची पसंती सध्या दुचाकी वाहनांना मिळताना दिसत आहे. अशा दुचाकी वाहनांसंदर्भातील काही नवे नियम सध्या परिवहन मंत्रालयानं जारी केले आहेत. 

दुचाकीवर लहान मुलांना बसवत असतानाचे हे नियम वाचल्यानंतरच प्रवासाला लागा. कारण, हे नियम अतिशय महत्त्वाचे असे आहेत. 

15 फेब्रुवारीपासूनच 9 महिने ते 4 वर्षे या वयोगटातील मुलांना घेऊन जात असताना नेमक्या कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावं याचे निर्देश शासनानं दिले आहेत. 

वेगमर्यादेपासून, सुरक्षिततेपर्यंतचे हे नियम आहेत तरी कसे, जाणून घ्या... 
- दुचाकीवर वयवर्ष 9 महिने ते 4 वर्षे या वयोगटातील मुलांना सोबत नेत असताना त्यांच्यासाठी सेफ्टी हार्नेसचा वापर करावा. 

- हार्नेस वॉटरप्रूफ आणि लाईट केअरिंग, ड्युरेबल असावा. 

- 4 हून कमी वयाची मुलं दुचाकीवरून घेऊन जात असल्यात वेगमर्यादा 40 किमी प्रतितास इतकीच असावी. 

- हेल्मेटचा वापर सक्तीचा असेल. लहानग्यांच्या मापाचं हेल्मेट वापरावं. 

- लहान मुलांना हेल्मेट नसल्यास दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्यात येणार आहे. 

कसं असावं हेल्मेट? 
लहान मुलांचं हेल्मेट कमी वजनाचं आणि वॉटरप्रूफ असावं. हेल्मेट बाजारात येईपर्यंत सायकलिंग हेल्मेट वापरण्याची मुभा असेल.