अनलॉक ४ : मेट्रोमध्ये आता टोकन चालणार नाही; जाणून घ्या नवे नियम

अनलॉक प्रक्रिये अंतर्गत येत्या ७ सप्टेंबरपासून दिल्लीमध्ये मेट्रो धावणार आहे.

Updated: Aug 31, 2020, 11:01 AM IST
अनलॉक ४ : मेट्रोमध्ये आता टोकन चालणार नाही; जाणून घ्या नवे नियम title=

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात सरकारने अनेक नियम शिथिल करत दिल्लीत मेट्रोसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही गाईडलाईन्स देखील जारी केल्या आहेत. 

मेट्रो प्रवासासाठी दिशा-निर्देश
- दिल्लीत मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी आता टोकन मिळणार नाही. टोकनमुळे कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामळे प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक कार्ड बनवणं आवश्यक असणार आहे. 

- या स्मार्ट कार्डचं रिचार्ज देखील ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पैसे स्वीकारले जाणार नाहीत.

- प्रवासादरम्यान प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. नाहीतर मास्क न घालणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.

- मेट्रो रेल्वे स्थानकावर आणि डब्ब्यात एकमेकांमध्ये १ मिटरचं अंतर बंधनकारक असणार आहे.

- मेट्रोमध्ये ACचं तापमाण नियंत्रणात असणार आहे.

- फक्त ठराविक स्थनकांवर मेट्रो थांबणार आहे. 

- प्रवाश्यांची संख्या देखील मर्यादित असणार आहे. 

- शिवाय प्रवासादरम्यान आसनव्यवस्था देखील ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणं सोपं होणार आहे.

- मेट्रो स्थानकाबाहेर थर्मल स्किनिंग आणि सॅनिटाझरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. 

- ज्या व्यक्तीचं तापमाण अधिक असेल त्याला प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 

अनलॉक प्रक्रियेअंतर्गत येत्या ७ सप्टेंबरपासून दिल्लीमध्ये मेट्रो धावणार आहे. देश पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने अनेक नियम शिथिल केले आहेत. सध्या देशात ७ लाख ८१ हजार ९७५ रुग्णांवर उपचार सुरू असून २७ लाख ७४ हजार ८०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.