भारत सरकारचे ७.७५ टक्के व्याज दराचे नवे बॉंड

गुंतवणूकदारांना दिलासा देत सरकारने नवे बॉंड बाजारात आणले आहेत.

Updated: Jan 3, 2018, 04:01 PM IST
भारत सरकारचे ७.७५ टक्के व्याज दराचे नवे बॉंड title=

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांना दिलासा देत सरकारने नवे बॉंड बाजारात आणले आहेत.

शेवटच्या दिवसाची धावपळ

याआधी सरकारने ८ टक्के व्याज दराचे बॉंड बाजारात आणले होते. त्याला गुंतवणूकदारांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता. शेवटच्या दिवसापर्यत धावपळ करत गुंतवणूकदारांनी  मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.

नवीन बॉंड

परंतु कालचा दिवस या बॉंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बऱ्याच लोकांची इच्छा असूनही यात गुंतवणूक करता आली नाही. अशा गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी सरकारने ७.७५ टक्के व्याजदराचे नवीन बॉंड बाजारात आणले आहेत.

कल बदलतोय

अलीकडच्या काळात बॅंका आणि पोस्टातील व्याजदर खाली आल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा कल बॉंडकडे वाढला आहे. शिवाय यात वयोगट, रक्कम यांच्या मर्यादा नाहीत. त्यामुळेच याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.