मुंबई: आजच्या काळात Netflix माहिती नाही असे फार क्वचितच असावेत. तरुणाईमध्ये तर Netflix वरील सीरिजच्या चर्चा रंगतात. आज OTT वर सर्वाधिक पाहिलं जाणारं Netflix हे जगभरात प्रसिद्ध आणि उत्तम कंटेन्ट देणारं अॅप म्हणून ओळखलं जातं. मात्र या अॅपची सुरुवात कशी झाली? कोणाच्या डोक्यात पहिल्यांदा ही युक्ती आली? असे काही प्रश्न तुम्हाला पडले का?
Netflix पाहणारे लाखो लोकांना कदाचित यामागची रंजक गोष्ट माहिती नसावी. एक सिनेमा पाहण्यासाठी आणलेल्या कॅसेटवर बसलेल्या दंडानंतर नेटफ्लिक्स ही संकल्पना डोक्यात आली. ती सत्यात उतरवली आणि आज जवळपास 27 हजार कोटींची कंपनीही या व्यक्तीनं सुरू केली. या लीडरची यशोगाथा आणि संघर्षमय प्रवास आज जाणून घेऊया.
रीड हेस्टिंग्स हे Netflix चे CEO आणि सह-संस्थापक आहेत. त्यांनी आपल्या मित्रासोबत 1997 मध्ये कॅलिफोर्निया इथे याची पहिल्यांदा सुरुवात केली होती. 25 लाख डॉलर्सची गुंतवणूक करून केवळ 30 कर्मचाऱ्यांसोबत या कंपनीचा प्रवास सुरू झाला.
फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार,रीड हेस्टिंग्स सध्या सुमारे $3.9 बिलियन म्हणजेच सुमारे 27 हजार कोटी रुपयांचे मालक आहेत. रीड हेस्टिंग्स यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
Netflix सुरू करण्याची आयडीया कशी मिळाली?
1997 मध्ये रीड हेस्टिंग्स यांनी पहिल्यांदा व्हिडीओ स्टोरमधून सिनेमाची कॅसेट भाड्याने विकत घेतली होती. मात्र ती परत करण्यासाठी विसरले. त्यांनी ती कॅसेट दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण केली नाही. 6 आठवड्यांनंतर जेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी तातडीने ती कॅसेट नेऊन दिली.
सिनेमा कॅसेट परत करण्यासाठी उशीर झाल्याने दुकानदाराने त्यांना 40 डॉलर दंड लावला. त्यांनंतर ते जिममध्ये गेले. तिथे व्यायाम करताना त्यांच्या डोक्यात विचार आला. जिममधील सेवा चांगली आहे. महिन्याभराचे सबस्क्रिप्शन भरल्यानंतर तिथे हवा तेवढावेळ आपण व्यायाम करू शकतो. मात्र भाड्याने घेतलेल्या कॅसेटचं तसं झालं नाही.
हाच विचार त्यांच्यासाठी नवी संकल्पना आणणारा होता. या एका विचारातून त्यांना ही युक्ती सुचली की आपण एक असा प्लॅटफॉर्म तयार करू शकतो ज्याचं सब्स्क्रिप्शन 1 महिना असेल. यावर लोक हवे तेवढावेळ सिनेमा किंवा वेबसीरिज पाहू शकतात. तिथे थांबू शकतात.
ऑनलाइन DVD पासून सुरूवात
रीड यांनी आपली ही आयडीया आपल्या मित्राला सांगितली. त्यावेळी त्यांचे मित्र मार्क ऐमजॉन पुस्तक विक्री व्यवसायाने प्रभावित झाले होते. या दोघांनी ठरवलं की आपण सुरुवातीला ऑनलाइन DVD भाड्याने देण्यास सुरुवात करूया. त्यांनी लोकांना हव्या असलेल्या DVD एक दिवसात उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली.
Netflix ने स्वत:चा कंटेट देखील सुरू केला. तोही लोकांना खूप आवडला. 1999 मध्ये रीड यांनी मंथली सब्सक्रिप्शन मॉडेल आणलं. 2000 सालापर्यंत 3 लाखहून अधिक लोक त्यांच्याशी जोडले गेले होते. 29 मे 2002 मध्ये कंपनीने आपला आयपीओ लाँच केला. 2005 पर्यंत नेटफ्लिक्सजवळ 35 हजारहून अधिक सिनेमाचा डेटा होता. 10 लाखहून अधिक DVD लोकांपर्यंत पोहोचू लागल्या.
आज Netflix OTT मधील उत्तम कंटेट देणारा सर्वात मोठा ब्रॅण्ड आहे. एक दंड भरावा लागल्याने एवढी मोठी कल्पना डोक्यात आली आणि त्यातून थेट 27 हजार करोड रुपयांची कंपनीच बघता बघता उभी राहिली.