NEET परीक्षेमध्ये 17% गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांंनाही मिळणार MBBS ला प्रवेश

सीबीएससीने नुकताच नीट (NEET) परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. 

Updated: Jun 5, 2018, 11:09 AM IST
NEET  परीक्षेमध्ये 17% गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांंनाही मिळणार MBBS ला प्रवेश  title=

मुंबई : सीबीएससीने नुकताच नीट (NEET) परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा आवश्यक असते. यंदा देशभरात  13,26,725 विद्यार्थ्यांनी नीट ही प्रवेशपरीक्षा दिली. मात्र यंदा लागलेल्या निकालानुसार, 17% मार्क मिळवणारा विद्यार्थीदेखील एमबीबीएसला प्रवेश घेऊ शकतो. NEET 2018 चा निकाल जाहीर, 99.99% सह कल्पना कुमारी देशात प्रथम

 17% मिळवणार्‍यालाही मिळणार प्रवेश   

 टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची कट ऑफ 720 पैकी 119 इतकी आहे तर आरक्षित विद्यार्थ्यांसाठी 720 पैकी 96 मार्क मिळवणारे विद्यार्थीदेखील प्रवेशास पात्र ठरणार आहे. त्यामुळे 17% मार्क मिळवणाराही प्रवेश घेऊ शकेल.  

 पर्सेंटाईल सिस्टम वेगळी  

 मागील वर्षी 720पैकी 180 किंवा त्याहून कमी मार्क्स मिळवणार्‍या 4300 विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. मेडिकल प्रवेश परिक्षेमध्ये निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम असल्याने 180 गुण मिळाले म्हणजे त्याने 40% उत्तर बरोबर दिली आहेत. 720 पैकी 180 म्हणजे 25% आहेत.परंतू नीट पर्सेंटल सिस्टीमनुसार 2017 मध्ये 180चा अर्थ विद्यार्थ्यांनी 64% गुण मिळवले आहेत.