वाराणसीत एनडीए नेत्यांचं शक्तीप्रदर्शन

पंतप्रधान मोदींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Updated: Apr 26, 2019, 12:00 PM IST
वाराणसीत एनडीए नेत्यांचं शक्तीप्रदर्शन title=

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नामांकनासाठी भाजपा नेत्यांसह घटक पक्षाचे नेतेही पोहचलेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लोजपा अध्यक्ष रामविलास पासवान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हेमा मालिनी, जयप्रदा, मनोज तिवारी, रवि किशन, दिनेश लाल यादव हे सर्व नेते उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेअकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज सकाळी एनडीएच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज देखील उपस्थित होते. एनडीएला दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाराणसीत कालच दाखल झाले आहेत. आज सकाळी उद्धव ठाकरेंनी काळभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अर्ज भरण्याआधी काळभैरवाचं दर्शन घेतलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत सकाळी बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझा बूथ सर्वात मजबूत हा संदेश देतानाच महिलांचं मतदान ५ टक्क्याने अधिक व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षांचा प्रत्येक उमेदवार हा आदरणीय आहे, त्यांच्याशी वैर नाही, बंधुभाव बाळगा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मला शिव्या देणाऱ्यांची पर्वा करत नाही, शिव्यांच्या चिखलातून कमळ फुलवतो असं मोदी म्हणाले.