नक्षलवादी तर क्रांतीकारी, राज बब्बर यांचं वादग्रस्त वक्तव्य

नक्षलवादी हे क्रांतीकारी असून त्यांना रोखणं कठीण

Updated: Nov 4, 2018, 09:57 PM IST
नक्षलवादी तर क्रांतीकारी, राज बब्बर यांचं वादग्रस्त वक्तव्य title=

रायपूर : छत्तीसगड निवडणुकांच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेस नेते राज बब्बर यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नक्षलवादी हे क्रांतीकारी असून त्यांना रोखणं कठीण असल्याचे विधान राज बब्बर यांनी केलंय. आपल्या अधिकारांसाठी ते प्राणांची आहुती देत असल्याचे ते म्हणालेत. शिवाय नक्षलवादी हिंसेचे पाऊल उचलून चुकी करत असल्याचे त्यांनी म्हटलंय. गोळीने नाही तर चर्चेने प्रश्न सुटू शकतात असंही बब्बर यांनी सांगितलंय. 

पाहा काय म्हणाले राज बब्बर