नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: स्वामींनी पुन्हा एकदा वाढवली गांधी घराण्याची डोकेदुखी

 नॅशनल हेरॉल्ड प्रकरण लावून धरणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आज या प्रकरणात 'आयकर बॉम्ब' टाकला. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 20, 2018, 11:33 PM IST
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: स्वामींनी पुन्हा एकदा वाढवली गांधी घराण्याची डोकेदुखी title=

नवी दिल्ली: गेल्या काही काळात काँग्रेसचे शिर्षस्थ नेतृत्व असलेल्या गांधी घराण्यासाठी डोकेदुखी ठरलेल्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. हे प्रकरण लावून धरणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आज या प्रकरणात 'आयकर बॉम्ब' टाकला. या आधी या प्रकरणात केवळ सोनीया आणि राहुल यांच्या रूपाने गांधी घराण्यातील दोनच व्यक्ती होत्या. पण, स्वामी यांनी या वेळी प्रियांका गांधी यांनाही या प्रकरणात ओढले आहे.

प्रकरणावर १७ मार्चला होणार सुनावनी

सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी (२०, जानेवारी) नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी संबंदी कागदपत्रे न्यायालयाकडे सोपवली. या वेळी स्वामी यांनी दावा केला की, नॅशनल हेरॉल्डच्या २ हजार कोटी संपत्तीच्या अधिग्रहणात सोनिया आणि राहुल गांदी यांच्यासह प्रियांका गांधी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावर आता १७ मार्चला सुनावनी केली जाणार आहे. तोपर्यंत ही सर्व कागदपत्रे सीलबंद लिफाप्यात ठेवण्यात यावेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

सोनिया, राहुल दोषी - स्वामी

स्वामी यांनी दावा केला आहे की, सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घोटाळ्यात सोनिया गांधी आणि काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील दोष स्पष्ट होत आहेत. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने यंग इंडियन प्रायवव्हेट लिमिटेडच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर विचार करण्यास शुक्रवारी (१९ जानेवारी) नकार दिला होता. या याचिकेत आयकर विभागाकडून कंपनीला पाठवण्यात आलेल्या नोटीशीला आव्हान देण्यात आले होते.