'या' बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले अव्वल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखीन एका प्रकारात सर्वांना मागे टाकलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 21, 2017, 08:22 PM IST
'या' बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले अव्वल title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखीन एका प्रकारात सर्वांना मागे टाकलं आहे.

ट्विटरची आकडेवारी प्रसिद्ध

नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर ट्विटरने गुजरात निवडणुकीसंदर्भातील आकडे प्रसिद्ध केले आहेत. या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अव्वल क्रमांक मिळवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल

ट्विटरने गुजरात निवडणुकीच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, निवडणुकी दरम्यान सर्वाधिक नाव ज्या व्यक्तीचं ट्विट करण्यात आलं त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल आहेत. मोदींचं नाव सर्वाधिक वेळा ट्विट करताना मेन्शन करण्यात आलं आहे.

हार्दिक पटेल चौथ्या क्रमांकावर 

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमित शहा तिसऱ्या क्रमांकावर तर, हार्दिक पटेल चौथ्या क्रमांकावर आहे. 

हॅशटॅगचं विश्लेषण

ट्विटरने १ डिसेंबर ते १८ डिसेंबर या दरम्यान वापरण्यात आलेल्या #GujaratElection2017 याचं विश्लेषण केलं. यानंतर ही माहिती समोर आली आहे. याच डेटानुसार, गुजरात निवडणुकीसंदर्भात २० लाख वेळा उल्लेख केला आहे. तर, 'विकास' या विषयावर ट्विटरवर सर्वाधिक चर्चा करण्यात आली.

उल्लेखनीय उमेदवार ठरले...

सोशल नेटवर्क साईट्सवर विजय रुपाणी सर्वात उल्लेखनीय उमेदवार ठरले. त्यानंतर दलित नेता जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकोर हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

गुजरात निवडणुकीदरम्यान ट्विटरवर भाजपचा उल्लेख ३८% वेळा करण्यात आला. तर, काँग्रेसचा उल्लेख ४२% वेळा करण्यात आला. भाजपच्या स्थानिक पक्षाचा १५% वेळा तर, काँग्रेसचा ५%  वेळा उल्लेख करण्यात आला.