मोदी सरकार देणार २ लाखांचं बक्षीस, घर बसल्या करावं लागणार 'हे' काम

८ नोव्हेंबर २०१६ साली रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 9, 2017, 04:08 PM IST
मोदी सरकार देणार २ लाखांचं बक्षीस, घर बसल्या करावं लागणार 'हे' काम title=
File Photo

नवी दिल्ली : नोटबंदीला ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं. ८ नोव्हेंबर २०१६ साली रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. एक वर्ष झाल्यानंतर नोटबंदीमुळे काय फायदे झालेत हे सरकार सांगत आहे.

नोटबंदीचा निर्णय देशाच्या हिताचा असल्याचं सरकार सांगत आहे तर नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झाल्याचं विरोधक म्हणत आहेत.

नोटबंदीच्या एक वर्षानंतर सरकारने एक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत तुम्हीही सहभाग घेऊ शकता. या स्पर्धेत विजेत्याला सरकारतर्फे २ लाख रुपये दिले जाणार आहेत.

दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या व्यक्तीला ५० हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच इतरांना २५-२५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुमच्यावर वयोमर्यादेची अट नाहीये. या स्पर्धेसाठी तुम्ही ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकता.

असा करा अर्ज:

जर तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही http://mygov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करु शकता. या वेबसाईटवर लॉगईन केल्यानंतर उजव्या बाजूला ऑप्शन टास्कवर क्लिक करा. त्यानंतर उघडणाऱ्या पेजवर तुम्हाला संबंधित स्पर्धेची लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही स्पर्धेत सहभागी होऊ शकता.

स्पर्धेच्या चार कॅटेगरी:

या स्पर्धेचं चार वर्गात विभाजन करण्यात आलं आहे. त्यानुसार वेगवेगळे नियमही ठरवण्यात आले आहेत. वेबसाईटवर लॉगईन केल्यानंतर तुम्हाला त्या पेजवर शेवटी चार लिंक दिलेले दिसेल. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही कॅटेगरीनुसार नियम आणि अटी वाचू शकता.

निबंध स्पर्धा:

स्पर्धेची पहिली कॅटेगरी म्हणजे निबंध लेखन स्पर्धा. यामध्ये तुम्हाला १२०० शब्दांत नोटबंदीच्या आठवणी, नोटबंदीचे फायदे सांगायचे आहेत. त्यासोबत मोदी सरकारच्या फाईट अगेंस्ट करप्शन अँड ब्लॅकमनी या मोहिमचे अपडेट्स सांगायचे आहेत. स्पर्धकाने लिहीलेल्या निबंधाचा फॉन्ट १२ करुन पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव करुन http://mygov.in साईटवर अपलोड करायचा आहे.

कार्टून आणि पोस्टर:

दुसरी कॅटेगरी आर्ट वर्कची आहे. काळा पैसा आणि करप्शन यावर एखादं क्रिएटिव्ह आर्टवर्क, कॅरिकेचर, कार्टून पोस्टर तुम्ही बनवू शकता.

व्हिडिओ: 

जर तुम्ही व्हिडिओ बनवण्यात एक्सपर्ट आहात तर काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधातील सरकारचं काम यावर एक व्हिडिओ बनवू शकता. हा व्हिडिओ अधिकाधिक ४ मिनिटांचा असावा.

कविता लेखन:

जर तुम्हाला कविता लिहिण्याची आवड आहे तर तुम्ही काळा पैसा आणि त्याविरोधात सरकारची लढाई यावर कविता करु शकता.