Central Government : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे. नरेंद्र मोदी सरकारची (PM Narendra Modi) मंत्रिमंडळ बैठक पार पडली.  

Updated: Aug 17, 2022, 10:27 PM IST
Central Government : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय title=

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे. नरेंद्र मोदी सरकारची (PM Narendra Modi) मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत इंटरेस्ट सब्वेंशन या (interest subvention scheme) योजनेला मंजूरी देण्यात आली. अल्प मुदतीच्या कृषीकर्जासाठी अनुदान जाहीर करण्यात आलंय. (narendra modi government cabinet approved interest subvention scheme minister anurag thakur give information)

वर्षाला 1.5 टक्के व्याजावर अनुदान दिलं जाईल. यासाठी जास्तीत जास्त 3 लाखांची मर्यादा ठेवण्यात आलीये. केंद्रीय मंत्रिमंडळानं या योजनेला मंजुरी दिल्याची माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी  दिली आहे.

सबव्हेंशन स्कीम म्हणजे काय?  (What Is Subvention Scheme)

सहकारी संस्था आणि बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प आणि दीर्घ मुदतीसाठी सरकारकडून कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. अनेक शेतकरी या कर्जाची वेळेवर परतफेड करतात. तर अनेक शेतकरी काही कारणास्तव कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करतात, त्यांनाच व्याज सवलत योजनेचा लाभ मिळेल.