चीनी वस्तूंच्या विरोधात होणार राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन !

चीनी वस्तूंच्या विरोधात 9 ऑगस्टपासून राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाची सुरवात केली जाणार आहे.

Updated: Aug 8, 2017, 10:40 AM IST
चीनी वस्तूंच्या विरोधात होणार राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन ! title=

नवी दिल्ली : चीनी वस्तूंच्या विरोधात 9 ऑगस्टपासून राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाची सुरवात केली जाणार आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरमध्ये देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन करण्यार आले आहे. प्रसिद्ध विचारवंत गोंविदाचार्य या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावणार आहेत.

 

“चीनी वस्तूंचा त्याग करून स्वाभिमान आणि स्वावलंबन दोन्हींना बळकटी मिळेल. पण त्याकरिता आवश्यक  विचारात्मक, संघटनात्मक आणि आंदोलनात्मक व्युह रचना राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन करत आहे. याकरिता लोकांनीही पुढाकार घेऊन आपला सहभाग आणि विचार मांडण्याची गरज आहे. " असे मत गोंविदाचार्य यांनी मांडले आहे.

 

" ज्या प्रकारे रक्षाबंधनाच्या वेळेस अनेक बहिणींनी चीनी राख्यांवर बहिष्कार टाकला तसाच आता चीनी वस्तूंचा त्याग करून त्याची होळी केली जाईल."असे मत आंदोलनाचे संयोजक पवन श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

 

"नागपुरात 'स्वाभिमान संवाद', 'संकल्प मार्च' आणि 'स्वाभिमान सभा' यांचे आयोजन करण्यात आले आहे. सभेनंतर लोकं घरातून आणलेल्या चीनी वस्तूंचे दहन करतील" असे राष्ट्रीय संघटन मंत्री बसवराज पाटील यांनी सांगितले आहे.

 

दोन दिवसांच्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कूटनीतिक, सैन्य, आणि आतंकवादावर चर्चा होईल.तशाच चीनी वस्तू भारतीय बाजारपेठेवर कशाप्रकारे आक्रमण करत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम यावर खुली चर्चा करण्यात येणार आहे.