Mysterious Light : पश्चिम बंगालमध्ये आकाशात दिसलेल्या प्रकाशाचे गूढ वाढलं; पाहा Video

Mysterious Light : आकाशातील हा प्रकाश टॉर्चसारखा वाटत होता. सोशल मीडियावर यूजर्सनी व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना हेच प्रश्न विचारले आहेत

Updated: Dec 16, 2022, 05:45 PM IST
Mysterious Light : पश्चिम बंगालमध्ये आकाशात दिसलेल्या प्रकाशाचे गूढ वाढलं; पाहा Video title=

Mysterious Light : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकातासह अनेक जिल्ह्यांमध्ये आकाशामध्ये एक विचित्र आणि रहस्यमयी अशी प्रकाश झोत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकाशाचा बिंदू पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. जवळपास पाच मिनिटांपेक्षाही अधिक वेळ हा प्रकाश दिसत होता. त्यानंतर तो अचानक गायब झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर (Social Media) या घटनेचा फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. हा नेमका कसला प्रकाश होता याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विविध तर्कविर्तकांना उधाण आले आहे.

हा प्रकाश कशाचा होता आणि तो कुठून आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात बोलताना, ते क्षेपणास्त्र, उपग्रह किंवा उल्कापिंडाचा भाग असू शकते, असे तज्ञांनी म्हटले आहे.

आकाशात टॉर्च लावलीय

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमधून संध्याकाळी 5.50 ते 5.55 दरम्यान हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. अनेकांनी आकाशात कोणीतरी टॉर्च लावून चाललं आहे अशी प्रतिक्रिया दिलीय.

अग्नी 5 क्षेपणास्त्राच्या चाचणीशीही जोडला संबंध

दरम्यान, या प्रकाशाचा संबंध अग्नी 5 क्षेपणास्त्राच्या चाचणीशीही जोडला जात आहे. क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे तर हा प्रकाश दिसत नाहीये ना? असा प्रश्न विचारला जात आहे. ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून संध्याकाळी 5.30 वाजता अग्नी 5 आण्विक सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे ही शक्यता वर्तवली जात आहे.