मुंबई : जगभरात कोरोनाचं थैमान आहे. कोरोना संकटात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहेत. असं असताना पोलीस सुट्टी घेण्यासाठी वेगवेगळी कारण सांगत आहेत. मध्यप्रदेशमध्ये एसएएफ जवानाने सुट्टी घेण्यासाठी चक्क आपल्या म्हैशीचं कारण सांगितलं आहे.
'आपल्या म्हशीला आपली खूप गरज आहे', असं म्हणत चक्क जवानाने अधिकाऱ्यांकडे सुट्टी मागितली आहे. रीवामध्ये स्पेशल आर्म्ड फोर्सच्या नवव्या बटालियनमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या जवानाला सुट्टीची गरज होती. सुट्टीच्या अर्जात तसा त्याने उल्लेख देखील केली.
या जवानाने आपल्या सुट्टीच्या अर्जात आईचं आजारपण आणि म्हशीची सेवा करण्याचे कारण दिले. त्या अर्जात त्याने असं म्हटलं की, ही तिच म्हैश आहे जिचं दूध पिऊन मी पोलीसमध्ये भर्ती होण्यासाठी तयार झालो. आता वेळ आता आहे तिच्या कर्जाची परतफेड करण्याची. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
कॉन्स्टेबल कुलदीप तोमर यांनी सुट्टी घेण्यासाठी दिलेलं कारण आणि त्यांचं पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय बनलं आहे.
आजारी म्हशीची काळजी घेण्यासाठी कुलदीप तोमर यांनी सुट्टी मागितली आहे. म्हशीच्या दुधाचं कर्ज फेडण्यासाठी मला ही सुट्टी हवी असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. एसएएफच्या 9 व्या बटालियनमध्ये तैनात कॉन्स्टेबल कुलदीप तोमर यांची आई गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्या. त्यामुळे तोमर आधीच 10 दिवस रजेवर जाऊन आले होते आणि त्यानंतर पुन्हा रजा हवी असल्याचा त्यांनी अर्ज केला.