Multibagger Stock | हा टेक्सटाइल स्टॉक भरघोस परतावा देण्याच्या तयारीत; तुफान कमाईची संधी

High return stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरतात. मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजेच असे शेअर्स जे गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देतात

Updated: Jan 25, 2022, 02:50 PM IST
Multibagger Stock | हा टेक्सटाइल स्टॉक भरघोस परतावा देण्याच्या तयारीत; तुफान कमाईची संधी title=

मुंबई : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरतात. मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजेच असे शेअर्स जे गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देतात. तुम्हीही अशा शेअर्सच्या शोधात असाल तर ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवालने गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक निवडले आहेत. हा स्टॉक म्हणजेच Trident होय.

Motilal Oswalचा सल्ला
ट्रायडंटच्या शेअरमध्ये घसरण झाल्यानंतरही ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवाल या स्टॉकवर बुलिश आहे. गुंतवणुकदारांना वस्त्रोद्योग क्षेत्रातील या शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

मोतीलाल ओसवाल यांचे म्हणणे आहे की, या शेअरमध्ये सध्याच्या भावापेक्षा 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते आणि हा स्टॉक 64 रुपयांचा स्थर गाठू शकतात.

1 वर्षात 340% परतावा
ट्रायडंट स्टॉकने मागील एका महिन्यात 17 टक्के, 3 महिन्यांत 53 टक्के, 6 महिन्यांत 240 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली आहे. तर 1 वर्षात 340 टक्के परतावा दिला आहे.