नवी दिल्ली : कॅपिटल मार्केटमध्ये हाय रिटर्न देणाऱ्या योजनांच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. Muthoot Fincorp NCD ने आपला नॉन कन्वर्टिबल डिबेंचर जारी केला आहे. ज्यामध्ये 26 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे. Muthoot Fincorp नॉन कन्वर्टिबल डिबेंचरच्या माध्यमातून 400 कोटी रुपये उभारणार आहे. या डिबेंचरची मॅच्युरिटी 27 महिन्यांपासून ते 87 महिन्यांपर्यंत आहे. NCD मध्ये वेगवेगळ्या पर्यायांमध्ये 10.2 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. येथे फिक्स डिपॉजिट किंवा रिकरिंग डिपॉजिटच्या तुलनेत 4 टक्के व्याज जास्त मिळते.
400 कोटी उभारण्याचे नियोजन
Muthoot Fincorp च्या NCD चा बेस साइज 200 कोटी रुपयांचा आहे. तसेच यात ग्रीनशू ऑप्शनच्या माध्यमातून कंपनी आणखी 200 कोटी रुपये उभारू शकते. म्हणजचे NCD च्या माध्यमातून एकूण 400 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उभारण्याचे नियोजन आहे.
किती मिळणार व्याज
NCD मध्ये 27 महिने, 60 महिने, 72 महिने आणि 87 महिन्यांच्या मॅच्युरिटीची सिरिज आहे. ज्यामध्ये फिक्स व्याजदर आहेत. यामध्ये तुम्ही महिन्याला किंवा वर्षाला व्याज मिळवण्याचा पर्याय निवडू शकता. 87 महिन्यांच्या मॅच्युरिटीसाठी 10.2 टक्क्यांचा व्याजदर आहे. म्हणजेच 87 महिन्यांनी पैसे दुप्पट करण्याचा पर्याय कंपनी देत आहे. अन्य पर्यायमध्ये 8.25%, 8.50%, 8.75%, 9.50% व्याजदर असणार आहे.
गुंतवणूक
एका NCDची इश्यु प्राइज 1000 रुपये आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी 10 NCDसाठी पैसे गुंतवणे बंधनकारक असणार आहे. म्हणजेच कमीत कमी 10 हजारांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
NCD म्हणजे काय
नॉन कन्वर्टिबल डिबेंचर हे फायनान्शिएल इस्ट्रुमेंट आहे. याला कंपनी जारी करते. यामाध्यमातून कंपनी गुंतवणूकदारांकडून पैसा उभारते. त्यासाठी एक पब्लिक इश्यु आणला जातो. यामध्ये गुंतवणूकदरांना निश्चित परतावा मिळतो. NCD चा अवधी निश्चित असतो. हा एक बँक एफडीसारखा गुंतवणूकीचा प्रकार आहे.