मर्डर मिस्ट्रीचा थरार! गुगल सर्चमुळे पोलिसांनी पकडला गुन्हेगार

प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी महिलेने चक्क गुगलची मदत घेतली.

Updated: Jun 23, 2021, 12:56 PM IST
मर्डर मिस्ट्रीचा थरार! गुगल सर्चमुळे पोलिसांनी पकडला गुन्हेगार title=

हरदा (मध्यप्रदेश) : आपल्याला सध्या इलेक्टॉनिक्स आणि सगळ्या गॅजेट्सची इतकी सवय झाली आहे की, आपण रोज काहीही महिती करुन घ्यायची असेल, तरी गुगल करतो. म्हणजे अगदी रस्ता शोधण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत. एखाद्या ठिकाण्याच्या माहितीपासून ते अभ्यासातल्या माहितीपर्यंत आपण सगळ्यासाठी गुगलवर अवलंबून रहातो. गुगलही आपल्याला सगळ्या गोष्टींची उत्तरे देतो. त्यामुळे असे काहीही नाही ज्याचे उत्तर गुगलकडे नाही. याचाच फायदा घेऊन एका महिलेने गुगला जे विचारले ते धक्कादाक आहे.

मध्यप्रदेशमधील हरदा येथील एका महिलेने प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली. मात्र, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या दोघांना मृतदेह कुठे लपवायचा हा प्रश्न पडला. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी महिलेने चक्क गुगलची मदत घेतली. तुम्हाला काय वाटते या नंतर काय झाले असेल? गुगलने खरेच महिलेला उत्तर दिले असेल?

गुगलकडून या महिलेले मदत तर मिळाली नाहीच, पंरतु गुगलची मदत घेणे तिला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे सध्या ती महिला आणि तिचा प्रियकर दोघेही गजाआड आहेत. मध्यप्रदेशमधील हरदा जिल्ह्यात मृत व्यक्तीची पत्नी तब्बसुम आणि प्रियकर इरफानला तब्बसुमचा पती आमिरच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 18 जूनला हरदा जिल्ह्यातील खेडीपूर भागात घडली आहे.

तब्बसुमने पोलिसांना पतीच्या मृत्यूबाबत माहिती दिली. मात्र, याबद्दल स्वत:ला काहीच माहिती नसल्याचे तिने सांगितले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासणीला सुरूवात केली.

दरम्यान तब्बसुमचा पती आमिर हा महाष्ट्रात काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आमिर बाहेर राहत असल्यामुळे तब्बसुमला आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळे इरफान तब्बसुमला आर्थिक मदत पुरवायचा. याचदरम्यान त्यांच्यात प्रेम झाले.

नशेच्या गोळ्या देऊन केली हत्या

कोरोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्याने आमिर हरद्याला परतला आणि घरीच राहू लागला. आमिर घरी राहत असल्यामुळे तब्बसुमला इरफानला भेटणे कठीण झाले होते. त्यानंतर दोघांनी आमिरचा काटा काढण्याचं ठरवलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमिरला दम्याचा आजार होता. त्याला नियमित औषधे घ्यावी लागायची. याचाच फायदा घेत तब्बसुमने एक दिवस त्याला नशेच्या गोळ्या दिल्या.

गुगल सर्च करुन शोधले हत्येचे प्रकार

नशेची गोळी घेतल्याने आमिर बेशुद्ध झाला. त्यानंतर तब्बसुम आणि इरफानने मिळून हातोड्याने आमिरची हत्या केली. तब्बसुमने पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तब्बसुमच्या कॉल डिटेल्सवरुन पोलिसांना संशय आला. यामध्ये तिने इरफानला अनेकदा फोन केले असल्याचे समोर आले.

यादरम्यान, पोलिसांनी मोबाईलवरची गुगल हिस्ट्री पाहिली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तब्बसुमने इंटरनेटवर 'कसे मारायचे, हात-पाय कसे बांधायचे आणि शरीराची विल्हेवाट कशी लावायची' असे सर्च केले होते.

पोलिसांनी त्यांना हे पुरावे दाखवताच या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. या गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे आणि रक्ताने माखलेले कपडे, मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. ही हत्या 18 जून रोजी झाली आणि पोलिसांनी हे प्रकरण 24 तासांत मिटवले.