Multibagger Stock | या शेअरने दिला पैसाच पैसा; 10 हजार रुपयांचे झाले तब्बल 1.11 कोटी, तुम्ही घेतले का?

शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजी दिसून येत आहे. सर्व गुंतवणूकदार आपला पोर्टफोलियो मजबूत करीत आहेत. शेअर बाजारात अनेक स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना लखपती-करोडपती केले आहे. अशाच एका स्टॉक बाबत आपण चर्चा करणार आहोत. 

Updated: Nov 11, 2021, 08:30 PM IST
Multibagger Stock | या शेअरने दिला पैसाच पैसा; 10 हजार रुपयांचे झाले तब्बल 1.11 कोटी, तुम्ही घेतले का? title=

सौरभ पांडे, झी मीडिया, मुंबई : शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजी दिसून येत आहे. सर्व गुंतवणूकदार आपला पोर्टफोलियो मजबूत करीत आहेत. शेअर बाजारात अनेक स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना लखपती-करोडपती केले आहे. अशाच एका स्टॉक बाबत आपण चर्चा करणार आहोत. 

गुंतवणूकदारांना मालामाल करणारा हा स्टॉक आहे आयशर मोटर्स (Eicher Motors Shares). 20 वर्षापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअर्समध्ये 10 हजार रुपये गुंतवले असते तर, आज या गुंतवणूकीची वॅल्यू 1.116 कोटी रुपये झाली असती.

दोन दशकामध्ये झाली मोठी वाढ
20 वर्षापूर्वी आयशर मोटर्सच्या एका शेअरची किंमत 2.43 रुपये होती. जी सध्या 2712 रुपये प्रति शेअर इतकी आहे. गेल्या दोन दशकात शेअर 1116 टक्क्यांनी वाढला आहे.

मागील सहा महिन्यात आयशर मोटारच्या शेअरची किंमत 2447.25 वरून वाढून 2712 च्या रेकॉर्ड स्तरावर होती. या अवधीमध्ये शेअरने शेअरधारकांना साधारण 11 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 

शेअरचे कॅल्कुलेशन
या शेअरमध्ये सहा महिन्यापूर्वी 10 हजार गुंतवले असते तर आज त्याचे 11,100 रुपये झाले असते. 

एका वर्षापूर्वी या शेअरमध्ये 10 हजार रुपये गुंतवले असते तर, आज 12,400 रुपये झाले असते. त्याचप्रमाणे दीर्घ कालावाधीसाठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या शेअरने मालामाल केले आहे.