मुकेश अंबानींची कंपनी खेळण्यांच्या बाजारात वाढवणार वर्चस्व, पाहा काय आहे योजना

Mukesh Ambani : मुंकेश अंबानी आणखी एका क्षेत्रात गुंतवणूक वाढवणार आहेत. याद्ववारे ते सामान्य मार्केटमध्ये प्रवेश करतील.

Updated: Oct 25, 2022, 11:18 PM IST
मुकेश अंबानींची कंपनी खेळण्यांच्या बाजारात वाढवणार वर्चस्व, पाहा काय आहे योजना title=

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स रिटेल आपल्या रोवन ब्रँडद्वारे खेळण्यांच्या बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवत आहे. याद्वारे ते छोट्या दुकानात स्वस्तात खेळणी उपलब्ध करून देणार आहेत. कंपनी आपला खेळणी वितरणाचा व्यवसाय रोवनच्या माध्यमातून चालवत आहे. आता कंपनीने या ब्रँडचे पहिले एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट (EBO) गुरुग्राममध्ये सुरु केले आहे. या स्टोअरचा आकार 1500 चौरस फूट आहे.

रिलायन्स रिटेलकडे (Reliance Retail) परवडणाऱ्या ब्रँडच्या खेळण्यांची विस्तृत श्रेणी असेल, ज्यात रोवन आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असेल, असे उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय ब्रिटीश टॉय ब्रँड हॅमलेजची उत्पादनेही उपलब्ध होणार आहेत.

हॅम्लेस (toy brand hamleys) हे खेळण्यांचे जगातील सर्वात जुने किरकोळ विक्रेता आहे आणि 2019 मध्ये ते रिलायन्सने विकत घेतले होते. hamleys या ब्रँडची खेळणी खूपच महाग असतात. दुसरीकडे, रोवन (toy brand rowan) रिलायन्स रिटेलला परवडणाऱ्या किमतीत विस्तीर्ण आणि कमी खर्चिक खेळण्यांच्या श्रेणीमध्ये स्थान निर्माण करण्यात मदत करेल. हॅम्लेज स्टोअर्स मोठ्या जागेवर सुरु केले जातील. तर रोवनचे (rowan) स्टोअर्स लहान आणि 500-1,000 चौरस फुटांच्या दरम्यान असतील.

2025 पर्यंत भारतातील खेळण्यांचा बाजार दुप्पट म्हणजेच 2 अब्ज डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता आहे.